संगमनेर : अमृतवाहिनी आय.टी.आय. अमृतनगर, संगमनेर येथे दिनांक २७ व २८ मार्च २०२५ रोजी पुणे येथील १) महिंद्रा ऑटो स्टील, पुणे , २) पार्कसन पॅकेजिंग
संगमनेर : अमृतवाहिनी आय.टी.आय. अमृतनगर, संगमनेर येथे दिनांक २७ व २८ मार्च २०२५ रोजी पुणे येथील १) महिंद्रा ऑटो स्टील, पुणे , २) पार्कसन पॅकेजिंग लिमिटेड, पुणे ३) डायना के.ऑटो स्टॅम्पिंग,भोसरी,पुणे तसेच४)मॅकलोड्स फार्मासिटिकल लि. दमन या कम्पनींचा कॅम्पस इंटरव्ह्यूनुकताच पार पडला. स्किल डायरेक्टर मा.श्री. प्रमोद मुंगी व शोभराज पाटील ब्रँच मॅनेजर यांनी अंतिम वर्षाच्या फिटर, इलेक्ट्रिशियन,वायरमन या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी एकूण ६८ विद्यार्थ्यांची निवड झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी आय.टी.आय.ची १९८४ साली स्थापना केली. संस्थेने गुणवत्तेत सातत्य राखल्याने संस्थेचा नावलौकिक वाढला आहे. येथील शैक्षणिक वातावरण, निसर्ग सुंदर परिसर,शिस्त,स्वच्छता व विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ.सुधीरजीतांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य .व्ही.व्ही.भाटे यांनी विद्यार्थ्यांचेअभिनंदन केले. इंटरव्ह्यू यशस्वी होण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग व सर्व स्टाफ ने विशेष परिश्रम घेतले आहे.
COMMENTS