Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अव्वल शंभर; पण, निकष काय ?

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या विभागाने भारतातील प्रभावशाली १०० जणांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. अर्थात हे १००

’महाराष्ट्र केसरी’ साठी मंगळवारपासून सातार्‍यात शड्डू घुमणार
पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार
अवकाळी पावसाचा फटका, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस राहणार बंद

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या विभागाने भारतातील प्रभावशाली १०० जणांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. अर्थात हे १०० शक्तिशाली व्यक्तिमत्व, त्यांना कोणत्या निकषांवर निवडले गेले,  त्याची कोणतीही स्पष्टता नाही. परंतु, एकंदरीत या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे पहिल्या स्थानावर आहेत. अर्थात दुसऱ्या स्थानावर भारताचे गृहमंत्री अमित शहा आहेत. पहिल्या आठ स्थानांवर आपण नजर टाकली तर, भाजपाचे सध्याच्या सरकारमधील मंत्री पंतप्रधान यांचा समावेश आहे; तर, चौथ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी यांचा या यादीत नववा क्रमांक आहे. प्रियंका गांधी या गेल्या वर्षी ६५ नंबर असताना या वर्षी मात्र त्या या यादीत ८१ व्या नंबर वर आहेत. अर्थात, या यादीमध्ये जी नाव आहेत, ते, प्रामुख्याने राजकीय आहेत आणि उद्योग क्षेत्रातील काही नावे आहेत. त्याचप्रमाणे काही सेलिब्रिटींची ही नावे यादीच्या अंतिम भागात दिसतात. परंतु, एकंदरीत नेमका या निवडीचा निकष काय हे मात्र स्पष्ट नाही. तुलनात्मक जर आपण एक गोष्ट सादर केली तर, अशा प्रकारचे सर्वे जेव्हा होतात, तेव्हा, ते निरपेक्ष पद्धतीनं यावं.  लोकांच्या आकलन क्षमतेला मर्यादा असलीतरी, त्यांना सातत्याने मूर्ख बनवता येत नाही. कारण, अशा प्रकारच्या गंभीर विषयांकडे पाहताना कोणत्याही संस्थेने तटस्थता ही जोपासायलाच हवी. एक तर, सर्वप्रथम अशा गंभीर यादीची निवड करायची असेल तर, त्याचे निकष नेमके काय आहेत, हे सर्वप्रथम जाहीर केले पाहिजेत. कारण, निकषांशिवाय केलेली कोणतीही निवड, ही अन्याय्य स्वरूपाची असू शकेल किंवा त्याला कुठलाही बेस असू शकणार नाही. अर्थात, यावर इंडियन एक्सप्रेस ने जवळपास शंभर पानांचं एक विशेष बुकलेट काढले आहे. जे करणं हे सर्वाधिक खर्चिक कार्य आहे. परंतु, ते साकारण्यात आलं. त्यामुळे या निवडीच्या सर्वे मागे नेमकं कोणी स्पॉन्सर्ड आहे का? कोणतीही संस्था काम करताना आणि खास करून भांडवली व्यवस्थेमध्ये नफाधारित काम करणं, हा त्यांचा उद्देश असतो. भांडवली जगतात नफाधारित काम करण्यासाठीच संस्था कार्यरत असतात. परंतु, जनतेमध्ये जेव्हा नेतृत्व स्थानी असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व बिम्बवायचं असतं, त्यावेळी वेगवेगळे निकष लावून त्यांची निवड करायला हवी. राजकारणामधली निवड ही वेगळ्या निकषांवर होते. तर, उद्योजकतेमधील निवड ही वेगळ्या निकषांवर होते. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींची निवड ही आणखी काही वेगळे निकष लावून करायला हवी. तर, व्यापार आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींची निवड आणखी काही वेगळे निकष लावून करता येते! परंतु, सब घोडे १२% असं म्हणून जर काम केलं तर, निश्चितपणे कोणाच्याही कार्यकर्तृत्वाचं आकलन करणं, हे तितकं योग्य होत नाही. जर, आपल्याला तुलनाच करायची म्हटली तर, लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असल्यामुळे आणि सलग अकराव्या वर्षीही ते पंतप्रधान असल्यामुळे, पंडित नेहरूंचं त्यांनी तोडलेले रेकॉर्ड, हे त्यांच्या नंबर एक स्थानावरच द्योतक आहे. परंतु, दुसऱ्या स्थानावर मात्र गृहमंत्री अमित शहा आहेत. परंतु, या ठिकाणी जर आपण एक भूमिका अशी घेतली तर, देशाचे पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यामध्ये जर लोकसभेच्या निवडणुकीवरून तुलना करायची म्हटली, तर, ज्या पंतप्रधानांनी ४०० शे पार चा नारा दिला होता, त्या नाऱ्याला रोखण्याचे काम राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे बहुमतापसून भाजपाला रोखणं, हा राहुल गांधींचा उद्देश सफल झाला. तर, दुसऱ्या बाजूला नेहरूंची पंतप्रधान पदाची तिसरी टर्म देखील नरेंद्र मोदी यांना मिळाली. ती त्यांनी मिळवून दाखवली. त्यामुळे, या दोघांच्याही कार्यामध्ये यशस्वीता झळकते.  हे दोघेही क्रमांक एक आणि दोन वर असायला हवे होते. जर, राजकीय निकषांवर ही निवड केली असती, असं आमचं ठाम मत आहे. परंतु, लोकांवर जर काही लादायचं असेल तर ते लाजणं यामुळे लोकांचं वैचारिक जागृती करण्याचे किंवा प्रबोधनाच जे माध्यम म्हणून माध्यमांकडे पाहिलं जातं ते तितकसं योग्य ठरत नाही!

COMMENTS