Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंजवडीतील आगीत चौघांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील हिंजवडी भागात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या मिनी बसला अचानक आग लागल्याने ट्रॅव्हरलमधील चार जणांचा

अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.
गुजरात निवडणुकीत भाजपचा निघणार घाम
अपयशावर मात करून ध्येय साध्य करावे ः प्रा. रामचंद्र राऊत

पुणे : पुण्यातील हिंजवडी भागात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या मिनी बसला अचानक आग लागल्याने ट्रॅव्हरलमधील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 6 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (19 मार्च) सकाळी 8 च्या सुमारास घडली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज वनमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचार्‍यांना घेऊन जाणारी ट्रव्हलर गाडी दाखल झाली. या ट्रॅव्हरलमध्ये 12 कर्मचारी होते. अचानक चालकाच्या पायाखाली आग लागली. ही बाब त्याच्या लक्षात येताच चालक आणि पुढे बसलेल्या काही कर्मचार्‍यांनी ताबडतोब बाहेर उड्या मारल्या. पण नंतर दरवाजा लॉक झाल्याने दहा जण बस मध्येच अडकले. यात चार जणांचा जागेवर आगीत होरपळून मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिंजवडीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

COMMENTS