Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या ४४ अभियंत्यांची वार्षिक पॅकेज १७ लाखांवर नोकरीसाठी निवड

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने यापुर्वीच  एका नामांकित जापनीज कंपनीशी  परस्पर सामंजस्य करार झाला असुन या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज

स्वीस महिला अभ्यास मंडळाची ‘ ध्रुव’ भेट ; सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक
शासकीय रुग्णालयांतील औषध तुटवड्याच्या तपासणीसाठी लोकप्रतिनिधींची समिती : मंत्री हसन मुश्रीफ
‘जालियनवाला’ घडले तसे ‘जालनावाला’ घडले

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने यापुर्वीच  एका नामांकित जापनीज कंपनीशी  परस्पर सामंजस्य करार झाला असुन या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन  सेल (आयआयआयसी) व ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने संजीवनीचे तब्बल ४४ अभियंत्यांची वार्षिक  पॅकेज रू १७ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी मध्येच जापनीज भाषा शिकविण्याची सुविधा केलेली असल्यामुळे विद्यार्थ्याना फायदा झाला, अशी  माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
        पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी महाविद्यालय जरी ग्रामिण भागात असले तरी या महाविद्यालयाने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातुन ग्रामिण ते आंतरराष्ट्रीय  प्रवास हा अनेकदा सिध्द केला. जापनीज कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या अभियंत्यांमुळे  हा प्रवास अधिक अधोरेखित झाला आहे.जापनीज कपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये  क्रिष्णराज  बडदे, गायत्री गवळी, कल्याणी घोडके, सानिका कदम, कार्तिक काळे, पार्थ गुंजाळ, संकेत पठारे, गायत्री सांगळे, शर्वय सुराळकर, विराजी शेलार, वैष्णवी शिंदे , आदित्य शिनगर, श्रुतिका ऊल्हारे, दिपाली झगडे, आशिष  काळे, किरण साबळे, किशोर  भांगरे, आर्यन आगवन, गायत्री भालेराव, अश्विनी  सालके, सानिका अम्बोरे, वैष्णवी  माणेे, अश्विनी  माणे, शिवप्रसाद माणे, साक्षी सोनवणे,ऋतुजा सुर्यवंशी , वैष्णवी  आग्रे, साक्षी भगत, विशाल  पवार, जानव्ही कापसे, औदुम्बर जुंदरे, महेश  येले,नितिन वाघ,तेजस दारूंटे, अंजली खाकरोडे, संकेत आसने, प्रेरणा सांगळे,सार्थक शिरसाठ, गौरी रेपाळे, अश्विनी  डमाळे, जयश्री रोकडे, अश्विनी  जाधव, गौरव चिने व अविनाश  निकम यांचा समावेश  आहे.    संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक, संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चांसलर डॉ. ए. जी. ठाकुर, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली, टी अँड  पी विभागाचे डीन डॉ. विशाल  तिडके व डीन आयआयआयसी प्रा. अतुल मोकळ यांचे अभिनंदन केले.


मी राहुरी तालुक्यातील देपळाली प्रवरा येथिल शेतकऱ्याचा  मुलगा. आई गृहिणी आहे. माझी ब्रन्च ऑटोनॉमस असल्यामुळे मला अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण ण मिळाले. शिवाय  जपानी भाषेचे  प्रशिक्षणही ही मिळाले. मला नेहमी वाटायचे की आपल्या कॉलेजचे अनेक माजी विद्यार्थी परदेशात मोठ्या  पदांवर नोकरीत त आहे. आपल्याला कधी जाता येईल. परंतु माझे हे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले, याचा मला सार्थ अभिमान आहे. माझे आई वडील खुप आनंदी आहेत. माझ्या आई वडीलांना मी हा आनंद देवु शकलो, म्हणुन मी स्वतःला भाग्यवान समजतो. नवोदित अभियंता संकेत पठारे.

 

COMMENTS