Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबतच : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभीमानी मतदारांच्या जिवाला लागला आहे. राजकारणातील सततच्या बदलत्या घडा

मंत्री टोपे व डॉ. पोखरणा यांच्यावर गुन्हे दाखल करा : विरोधी पक्ष नेते दरेकर यांची मागणी
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
जिरवा-जिरवीसाठी विरोधकांनी पदाचा वापर : ना. अजित पवार

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभीमानी मतदारांच्या जिवाला लागला आहे. राजकारणातील सततच्या बदलत्या घडामोडीमुळे ज्या नेतृत्वाने गेली 35 वर्षे अन्यायाचे, घराघरात फुट पाडण्याचे, कार्यकर्त्यांना अपमानीत करण्याचे काम केले. त्या नेतृत्वाचा व माझा अनेकवेळा टोकाचा संघर्ष झाला. तेच नेतृत्व भाजपाच्या नेतेमंडळीच्या मागेपुढे लुडबुड करत असेल भाजपा प्रवेशाची स्वप्ने पहात असेल तर स्वाभीमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहुन यापुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबरोबर काम करु, असा निर्णय भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या मेळाव्यात जाहीर केला.
प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात स्वाभीमानी मतदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकार्त्यांचा संवाद मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी नगरसेवक एल. एन. शहा होते.
निशिकांत भोसले पाटील म्हणाले, गेली 10 वर्षे भाजपा पक्षाचे विचार व काम घराघरात पोहचविले. कामाची पोच पावती म्हणून पक्षाने सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपविली. जिल्ह्यात भाजपाचे संघटनात्मक काम ही राज्य पातळीवर पक्ष दखल घेईल असे केले. भाजपा पक्ष या मतदार संघातील उमेदवारी खेचुन आणेल. मात्र, वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन मला महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याचा आदेश आला. आदेशाचे पालन करत मित्र पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या बळावर विधानसभा लढलो. निसटता पराभव मान्य करुन न खचता पुन्हा मतदार संघातील स्वाभीमानी मतदारांच्या हितासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तुमच्याबरोबर एक कुटुंब म्हणून मी तुमच्या बरोबर आहे.
कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा कायम विरोध असेल यासाठी भविष्यातील राजकारण डोळ्यांसमोर ठेवून आपण राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा घेण्याचा निर्णय उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगून निशिकांतदादा म्हणाले, आपला विरोधक आ. जयंत पाटील आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करु. कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल तो माझा निर्णय असेल. तुम्ही माझे खर्‍या अर्थाने शक्तीपीठ आहात. तुमच्यासाठी व मतदार संघाच्या विकासासाठी पुढील पाच वर्षे मोठ्या जबाबदारीने काम करु. महायुतीचे सरकार आपल्याला निधी कमी पडू देणार नाही. या क्षणापासून मी व तुम्ही एकीच्या बळाने काम करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांची विक्रमी सभासद नोंदणी करु, असा निर्धार करुन विश्‍वास दिला.

COMMENTS