नवी दिल्ली : नीती आयोगाने नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे ’विकसित भारत 2047 च्या दिशेने मार्गक्रमण : अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक भा

नवी दिल्ली : नीती आयोगाने नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे ’विकसित भारत 2047 च्या दिशेने मार्गक्रमण : अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक भागीदारी आणि कायद्यांचे बळकटीकरण’ या विषयावरील परिषद आयोजित केली होती. या परिषदेला नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार तसेच संरक्षण मंत्रालयाचे सचिव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पुढील दोन दशकांतील भारताच्या विकास यात्रेसाठी आवश्यक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ञांच्या पथकाचे विचारमंथन, मुख्य भाषण आणि चर्चा यांचा समावेश होता.
वर्ष 2047 पर्यंत आर्थिक वृद्धी आणि जागतिक स्पर्धात्मकता गाठण्यासाठी पॅनल चर्चा कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी राहिली, यावेळी धोरणकर्ते, शैक्षणिक आणि उद्योगजगतातील मान्यताप्राप्त तज्ञांनी जागतिक आर्थिक शक्तीस्थान बनण्याच्या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नानांवर प्रकाशझोत टाकला. या चर्चेमध्ये नियामक सुधारणा, नवोन्मेष, पायाभूत सेवा सुविधांचा विस्तार आणि जागतिक व्यापारात भारताची धोरणात्मक भूमिका यांच्या महत्वावर भर देण्यात आला. संशोधन आणि विकास तसेच वित्तीय समावेशन आणि जागतिक पुरवठा साखळीतील समन्वय यांमध्ये खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला मोठे महत्व असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. दीर्घकालीन आर्थिक लवचिकतेसाठी सार्वभौम पत मानांकन, ऊर्जा सुरक्षा आणि आवश्यक कच्च्या मालाची उपलब्धता अनिवार्य आहे. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय फायद्याचा लाभ घेण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत गुंतवणुकींना महत्त्वपूर्ण म्हणून ओळखले गेले.
COMMENTS