Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जल जीवनच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करा : खासदार नीलेश लंके यांची मागणी 

अहिल्यानगर :अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी

म्हाळुंगी पुलावरील 10 सुशोभीकरण कुंड्याची विकृत प्रवृत्ती कडून नासाडी
नव्याने दिलेले कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पाथर्डीत उपोषण
जिल्हा अनलॉक कायम, व्यवहार सुरू राहणार ; दुसर्‍या आठवड्यातही जिल्हा प्रथम स्तरमध्येच

अहिल्यानगर :अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडीट करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची शुक्रवारी नवी दिल्लीत भेट घेऊन मागणी केली. तसे पत्रही खा. लंके यांनी मंत्री पाटील यांना सुपूर्द केले.
मंत्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जनजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुर ७९ योजनांपैकी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दहा योजना पुर्ण झाल्या आहेत. या कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तशा तक्रारीही आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज, आनंदनगर व अन्य आठ योजनांचे केंद्रीय समिती मार्फत ऑडीट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार उघड होणार आहे. मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर या योजनांचे ऑडीट करावे अशी मागणी खा. लंके यांनी निवेदनात केली आहे.

COMMENTS