मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा असतांना हा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. भाजपन
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा असतांना हा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. भाजपने शिर्डीतील राज्यस्तरीय विशेष अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 22 जानेवारी रोजी अंतिम सुनावणी व्हावी यासाठी फडणवीस सरकार प्रयत्नशील असल्यामुळे या निवडणुका आता एप्रिलमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला असला तरी, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुती पुन्हा एकदा एकत्र येत या निवडणुकांना सामौरे जाण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.
COMMENTS