बारा तपानंतर येणारा कुंभमेळा म्हणजे महाकुंभ मेळा. आपण सर्वजण जाणतो की, एक तप बारा वर्षाचे असते. दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो. तब्बल बारा बारा
बारा तपानंतर येणारा कुंभमेळा म्हणजे महाकुंभ मेळा. आपण सर्वजण जाणतो की, एक तप बारा वर्षाचे असते. दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो. तब्बल बारा बारा कुंभमेळा झाले की, मग, महाकुंभ मेळा येतो. कुंभमेळा देशातील चार ठिकाणी होतात. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. परंतु, महाकुंभ मेळा फक्त प्रयागराज येथेच होतो. सुमारे १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील असा अंदाज बांधला गेला आहे. त्यादृष्टीने शासन-प्रशासन तत्परतेने व्यवस्था करित असल्या तरी, लोकांची कडाक्याच्या थंडीत गैरसोय होत असल्याचे काही लोकांची तक्रार आहे. अर्थात, त्यावर लिहीणं किंवा बोलणं तितकसं योग्य वाटणार नाही. परंतु, हा महाकुंभ मेळ्यात एका पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री चा आणि मुंबई आयायटी मधून एरोस्पेस अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेल्या अभय सिंह नामक साधू ने मात्र माध्यमाच्या माध्यमातून आख्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अभय सिंह यांचे आखाड्यातील साधू प्रमाणे नामकरण झालेले नसले तरी, ते स्वतः ला कल्की चा अवतार मात्र मानतात. मुंबई आयआयटीतून उच्चशिक्षित झालेले अभय सिंह बाबा कॅनडा या देशात मोठ्या पॅकेजचा जाॅब सोडून आले. सध्या ते मिडियाशी बोलताना जे काही सांगत आहेत, त्याचा सरळ अर्थ हाच आहे की, विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सुसंगत अशी अंतर्यामी अध्यात्माची ओढ. धर्म माणसासाठी असतो. धर्मात माणूस असतो म्हणजे तो धर्म धारण करतो. जगात वेगवेगळे धर्म आहेत. परंतु, प्रत्येक धर्मात माणसाने स्वतःला जाणून घेण्याची प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन आहे. स्वतःला जाणून घेण्याचा मार्ग हा ध्यान साधनेतून जातो. याला प्रत्येक धर्माने वेगवेगळी नावे जरूर दिली असतील किंवा आहेत. ध्यान साधना ही प्रक्रिया आहे. सर्वात सोपी पध्दत श्वासावर ध्यान देण्यातून साधता येते. परंतु, ही प्रक्रिया काही पंथात अथवा धर्मात आत्मक्लेशाच्या मार्गाने पुढे जाते. त्या आत्मक्लेशाच्या मार्गात नागा साधूंचीही साधना येते. आत्मक्लेश आणि चंगळ असे दोन टोकाचे मार्ग आहेत. मात्र यातूनच मध्यम मार्ग देखील जातो आणि मध्यमार्गातून केलेली साधना माणसाला सुसह्य बनवते. आयआयटीएन बाबा म्हणून ओळखले जाणारे अभयसिंग यांना अध्यात्माची ओढ असण्यापेक्षा बाह्य जगाचा जो अनुभव आला, तांत्रिक शिक्षण, कॉर्पोरेट नोकरी या सगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊनही त्यांना मनाला समाधान मिळत नव्हते. मनाच्या समाधानासाठी अस्वस्थ असलेली ही व्यक्ती आपल्या घरातच एकांतात बसायला लागली. या एकांताचा अर्थ त्यांच्या घरच्यांनी ‘तो वेडा झालाय’, असं समजून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांची मनाची अस्वस्थता कायम राहिली. त्यामुळे, मनाच्या शांतीच्या शोधात घर सोडून बाहेर पडलेले अभयसिंह सरळ अध्यात्माच्या मार्गावर जाऊन आपलं मन जाणून घेत आहेत. मन जाणून घेताना त्यांना बाह्य जगापेक्षा अंतर्यामी जाणून घेण्याचं जे समाधान मिळत आहे; त्याची परिणती म्हणजे त्यांनी घेतलेला संन्यास-वैराग्य! अर्थात, स्वतःला जाणून घेण्याच्या प्रयत्नात किंवा त्या मार्गात अध्यात्म हीच प्रक्रिया आहे. ती जेव्हा कळायला लागते, तेव्हा आनंदाची अनुभूती जी जगायला मिळते. त्यातून अभय सिंह बाबा सतत हसतमुख आहेत. जगाच्या दृष्टीने आयआयटी झालेली ही व्यक्ती कॉर्पोरेट कंपनीची सीईओ बनली पाहिजे होती; हा भौतिक विचार करत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला एवढं सगळं घेऊनही मनाला समाधान मिळत नाही. मग हे समाधान नेमकं कुठे आहे? तर त्याचा शोध अभयसिंह बाबा यांनी अध्यात्मातून घेतला आणि हाच त्यांचा जीवन प्रवास होत चालला असला तरी, पुढे मार्ग गवसेल अशी आशा त्यांना आहे. माणसाचे हे अंतर्मन जाणणं गरजेचे असते.
COMMENTS