Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोकरीत असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाने तात्काळ जमा करावेत

कोल्हापूर:सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, उद्योगात, नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाना

राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी देवळातील प्रज्ञा आणि प्रगतीची निवड
Nanded : विजयादशमी निमित्त आरएसएस कडून पथसंचलन (Video)
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ
कोल्हापूर:सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, उद्योगात, नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाना प्राप्त केला असल्यास अथवा परवाना प्राप्त केल्यानंतर ते नोकरीत रुजू झाले असल्यास अशा व्यक्तींनी दि.31 जानेवारी 2025 पूर्वी त्यांचे ऑटोरिक्षा परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे स्वेच्छेने जमा करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये ऑटोरिक्षा परवाना संख्या मर्यादीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय शासन अधिसूचना दि. 17 जून 2017 अन्वये विखंडीत केल्याने सध्या खुले ऑटोरिक्षा परवाना धोरण राबविण्यात येत आहे. ऑटोरिक्षा परवाना धारण करताना अथवा परवाना धारण केल्यावर परवानाधारक सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, उद्योगात नोकरी करीता नसावेत अशी प्राधिकरणाची अट आहे. या अनुषंगाने शासन निर्णय दि. 18 जुलै 2017 मधील अनुक्रमांक 3 नुसार “अर्जदार तो सरकारी / निमसरकारी, खासगी कंपनीत अथवा संघटीत क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत / उद्योगात नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील” असे विहित करण्यात आलेले आहे. अशा पध्दतीने धारण केलेले ऑटोरिक्षा परवाने निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहीत केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे श्री. भोर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000

COMMENTS