मुंबई : मुंबईमध्ये जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी संध्याकाळी वां
मुंबई : मुंबईमध्ये जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी संध्याकाळी वांद्रे परिसरात घडली. या परिसरातील खेरवाडीच्या वाय कॉलनीत राहणार्या अभिलाषा औटी (वय 36) यांनी त्यांचा मुलगा सर्वेश (वय 10) याची गळा आवळून हत्या केली.
अभिलाषा औटी याला स्क्रिझोफेनिया हा आजार होता. या आजाराचा रुग्ण अतिआक्रमक किंवा अतिप्रेमळ वागतो. याच भरात अभिलाषा यांनी टोकाचे पाऊल उचलत लहानग्या सर्वेशचा गळा वायरने आवळला आणि त्याला ठार मारले. या घटनेमुळे खेरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औटी कुटुंबीय हे वांद्रे पूर्वेला असणार्या खेरवाडी परिसरातील वाय कॉलनीत राहत होते. सर्वेशचे वडील हे उपसचिवपदी कार्यरत होते. गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा आणि त्यांचा मुलगा सर्वेश हे दोघेच घरात होते. अभिलाषा यांना स्क्रिझोफेनिया आजार असल्याने त्यांची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. गुरुवारी काही कारणामुळे अभिलाषा यांना राग आला आणि त्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. त्यांनी रागाच्या भरात सर्वेशला खेचत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा लावून घेतला आणि एका वायरने सर्वेशचा गळा आवळला. या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वेशचे वडील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. अभिलाषा यांचे पती हे सरकारी कर्मचारी असून उपसचिव पदी कार्यरत असून सदर घटनेने फरच खचून गेले असल्याची महिती पोलिसांनी दिली. पोलिस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे खेरवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS