Homeताज्या बातम्यासंपादकीय

जगाचे छप्पर हादरले !

जगाचे छप्पर समजले जाणाऱ्या जाणाऱ्या तिबेटमध्ये अतिशय शक्तिशाली भूकंप काल झाला. ज्यामध्ये जवळपास दीडशे लोक प्राणाला मुकले; तर, जवळपास दोनशे लोक जख

अंजनेरी गडावरील 10 पर्यटकांची सुटका
राज्यस्तरीय रोप स्किपिंगमध्ये ‘ध्रुव’ची ४६ सुवर्णपदकांची कमाई
मुंबईत मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या

जगाचे छप्पर समजले जाणाऱ्या जाणाऱ्या तिबेटमध्ये अतिशय शक्तिशाली भूकंप काल झाला. ज्यामध्ये जवळपास दीडशे लोक प्राणाला मुकले; तर, जवळपास दोनशे लोक जखमी झाले. चीनने या भूकंपाच्या संदर्भात एक व्हिडिओ प्रदर्शित केला आणि त्यामध्ये तिबेटच्या शिगात्से या शहराच्या लगत हा भूकंप झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७.४  रेक्टर स्केलचा हा भूकंप बिहार आणि नेपाळलाही स्पर्शून गेला. या भूकंपाचे एपिक सेंटर हे माउंट एवरेस्ट या पर्वताच्या पासून ५० मैल दूर अंतरावर आहे, अशी चिनने माहिती दिली आहे. या भूकंपामध्ये जखमी झालेल्या व बेघर झालेल्या लोकांना शिवाय भूकंपामध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍खाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी जवळपास पंधराशे सैनिक त्यासाठी मदत कार्यात दिनरात्र परिश्रम घेत आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी झालेला हा भूकंप याच्या दोन प्रकारच्या रेक्टर्स स्केलची नोंदणी करण्यात आलेली आहे. चीनने हे रेक्टर स्केल ६.८ एवढे असल्याचे म्हटले आहे. युएस स्टेटच्या जिऑलॉजी  विभागाने हा सात पेक्षा अधिक मोठ्या रेक्टर स्केल चा भूकंप असल्याचे म्हटले आहे. चीनच्या टिंगरी काउंटी प्रदेशात असलेल्या शिगात्से शहरापासून जवळच या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सर्वाधिक मोठी हानी शिगात्से या शहरामध्ये झाली असल्याचे चीनच्या झिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सध्या चीन समर्पित बौद्ध धम्माचे पंचेन लामा यांचे मुख्यालय असलेल्या शिगात्से या शहरामध्ये इमारतींना अक्षरशः ढिकाऱ्याचे स्वरूप आलेले आहे. अर्थात, या भागामध्ये अतिशय कडाक्याची थंडी असल्यामुळे  बेघर झालेल्या लोकांना कडाक्याचा थंडीचा सामना करावा लागत आहे. परंतु, त्यांच्यासाठी तात्पुरत्या उबदार निवारा असण्याची व्यवस्था केल्याचेही सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. ३० हजारपेक्षा पेक्षा अधिक लोकांना एका सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याचे आणि त्यासाठी वीज आणि मोबाईल यंत्रणा तात्काळ पुरवण्यात आल्याचे तिबेटच्या सरकारी सूत्राने म्हटले आहे. शिगात्से या शहरामध्ये जवळपास साडेतीन हजार पेक्षा अधिक इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत बेघर झालेला लोकांना तातडीने आश्रय देण्यात आला आहे. शिगात्से या विभागाची एकूण निवासी लोकसंख्या आठ लाख एवढी आहे.  हा संपूर्ण भाग पंचेन लामा या  बौद्ध धम्म गुरुच्या नेतृत्वात असल्याचेही म्हटले जाते. पंचेन लामा हे दलाई लामा यांच्यानंतर दुसरे सर्वात महत्त्वाचे बौद्ध धम्माचे गुरु  आहेत. भूकंपाचा तडाका भारतातील बिहार या राज्यालाही बसला आणि नेपाल मध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अशा प्रकारचा अधिक रेक्टर्स स्केलचा भूकंप चीनमध्ये २००८ मध्ये झाला होता; ज्यामध्ये ७० हजार लोकांना प्राणास मुकावे लागले होते. यापेक्षाही थोडा अधिक रेक्टर्स केला असलेला म्हणजे ७.८ रेक्टर स्केल असलेला भूकंप नेपाळच्या काठमांडू मध्ये झाला होता. २०१५ या वर्षी त्यावेळी जवळपास ९ हजार लोक ठार झाले होते. नैसर्गिक संकट हे अचानक कोसळत असलं तरी, त्यावर मानवी समुदायाने बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. जगात सतत भूकंपप्रवण देश म्हणून जापान ओळखला जातो. पण, त्यामुळे जपानच्या गृह बांधणी पासून तर सर्वच प्रकारच्या भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञान  जपानमध्ये वापरले जाते. चीनमध्ये देखील हे तंत्रज्ञान अधिक प्रगत पद्धतीने वापरले जाते. परंतु, तिबेट हा भाग हिमालयाच्या कुशीत असल्यामुळे तो अधिक उंचीवर आहे. या भागाला जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाते. डोंगराळ भाग असल्यामुळे आणि त्यातही बर्फाळ पर्वताच्या रांगात येणारा भाग असल्यामुळे कडाक्याची थंडी, विरळ लोकवस्ती आणि त्याचमुळे मदत कार्याला होणारा विलंब या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या भागातील पुनर्वसन प्रक्रिया ही मोठ्या श्रमाने राबवली जात असल्याचे चीनचे राष्ट्र प्रमुख झि पिंग यांनी म्हटले आहे.

COMMENTS