Homeताज्या बातम्यासंपादकीय

एच‌एमव्हीपीच्या भीतीचा अवास्तव बाजार!

 एचएमपीव्ही अर्थात ह्युमन मेटॅनेमूव्ह व्हायरस या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातल्याचे गेल्या काही दिवसांपासून आपण प्रसार मध्यम आणि इलेक्ट्रॉनिक म

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव | LokNews24
एकलव्य संघटनेच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे ब्राम्हणगावात उद्घाटन
‘विक्रांत’ प्रकरणी सोमय्यांना हाय कोर्टाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण

 एचएमपीव्ही अर्थात ह्युमन मेटॅनेमूव्ह व्हायरस या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातल्याचे गेल्या काही दिवसांपासून आपण प्रसार मध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहत आहोत; वाचत आहोत. या व्हायरसमुळे जगभरात पुन्हा महामारी येईल, अशा प्रकारच्या अफवाही या काळात उठत आहेत. वास्तविक, हा व्हायरस अतिशय सामान्य असा व्हायरस आहे. पंचवीस वर्षांपूर्वी २००१ मध्ये याचा पहिला रुग्ण नेदरलँड मध्ये सापडला होता. सध्या चीनमध्ये हे रुग्ण सापडत आहेत. भारतातही काल कर्नाटकातून दोन आणि गुजरात मधून एक, अशा तीन रुग्णांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. अर्थात,  वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी या संदर्भात वारंवार जनजागृतीसाठी आपली निवेदने प्रसारित केली आहेत. यामध्ये अनेक वैद्यकीय तज्ञ म्हणतात की, अशा प्रकारचा व्हायरसची वीस वर्षांपूर्वी माणसाला  लागण झाली होती. तेव्हापासून तो मानवी जीवनामध्ये अस्तित्वात आहे. ६० वर्षांपूर्वी या व्हायरसची ओळख चिमणी या अतिशय लहान पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु, या व्हायरसमुळे सर्दी, खोकला आणि ताप ही फ्ल्यूची लक्षणे दिसतात. सहज बरी होणारी ही लक्षणे घरी राहूनही बरी होतात. यासाठी, रुग्णालयात ऍडमिट होण्याची गरज नाही. लहान मुलांना याची लागण होते.  लहान मुलांना ब्रँकायटीस झाला म्हणजे त्यांना वाफ देणे, त्यांच्या छातीत अडकलेला कफ विरघळवणे, या सामान्य प्रक्रिया करण्यासाठी काही वेळा रुग्णालयात दाखल करावे लागते; परंतु, ही बाब तितकी गंभीर नाही. वयोवृद्धांमध्ये देखील सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे सामान्य आहेत आणि ही दर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आपल्याला बघायला मिळतातच! या व्हायरस विषयी प्रसार माध्यमांनी जो गहजब सरू केला आहे, त्याला घाबरण्याचं कारण नाही. कारण, बऱ्याच वेळा प्रसार माध्यम ही आपल्या बातम्या देतात तेव्हा त्यामागे एक साखळी असल्याचे दिसतें. फार्मा कंपन्या या जगाच्या एकूण आरोग्य अर्थव्यवस्थेवर कमांड ठेवून आहेत. त्यामुळे, आरोग्य क्षेत्रावर फार्मा कंपन्यांनी वर्चस्व मिळवले आहे.  एखाद्या छोट्याश्या व्हायरसच्या प्रसाराचा मीडिया कसा गहजब करतो आहे, त्यावर किती बातम्या देतो आहे, किती माहिती देतो आहे, या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला एक लक्षात येते की, फार्मा कंपन्यांचं आरोग्य मार्केट हे अशा प्रकारे बहारात आणलं जातं! नागरिकांमध्ये त्यासंदर्भात घबराट निर्माण केली जाते. आरोग्य संदर्भात घबराट निर्माण झाली की, लोक त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि हा खर्च खाजगी क्षेत्रातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये  मोठ्या प्रमाणात खर्च होतो. सरकारने खास करून राज्य सरकारने पाच लाखापर्यंत दिलेलं  ‘आरोग्य सुरक्षा कवच’ या खाजगी हॉस्पिटल्समध्ये चालत नाही. त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण करून जरा ही सर्दी, खोकला, ताप  झाले की, त्यांना मोठ्या हॉस्पिटलच्या वाटा धरायला लावायच्या आणि मग त्यांच्या परिस्थितीचा अंदाज न घेता त्यांच्या खिशाची लूट करायची; अशा प्रकारे ही मोडस ऑपरेंडी एक प्रकारे सुरू असते. त्यामुळे, नागरिकांनी याला घाबरून जाण्याचे कारण नाही. कालच, राज्य सरकारने या संदर्भात एक पत्र काढून लोकांमध्ये जनजागृती आणि लोकांना धीर देण्याचा प्रयत्नही केला आहे.  फ्लू चे आजार हे साधारणतः दर हिवाळ्यात आपल्याला भेडसावत असतात. सर्दी, ताप, खोकला हा नेहमीचा आजार सर्वसामान्य झालेला आहे. एचएमव्हीपी या व्हायरस मध्येही हाच त्रास असतो. अन्य काहीही कारण नाही. रुग्णांना यासाठी कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही, असे वारंवार तज्ञांनी सांगितले आहे त्यामुळे साठ वर्षांपूर्वीच ओळख झालेला हा व्हायरस मानवी जीवनामध्ये गेल्या २० ते २५ वर्षापासून अस्तित्वात आहे. याविषयी कोणतेही मोठे नुकसान किंवा आजार होत नाही, हे वारंवार तज्ञांनी सांगितले आहे. परंतु, सर्वसामान्य लोकांना आरोग्यावर खर्च करण्यासाठी भीती दाखवून बाध्य करणारी यंत्रणा विकसित झाली आहे, त्याचे हे गमक आहे!

COMMENTS