Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या ; परभणीतील मोर्चात मागणी

परभणी :सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येच्या विरोधात परभणीमध्ये शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून मं

पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडर तीन हजार पार
आषाढी वारीसाठी वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत
आई-वडील शिक्षकांचे नाव उंचवा, हीच खरी कर्मवीरांना आदरांजली

परभणी :सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येच्या विरोधात परभणीमध्ये शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात आली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना धमकी देण्यात आली. मात्र, यापुढे त्यांच्या कुटुंबीयांना आणि धनंजय देशमुखांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने देखील फिरु देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे यांनी आरोपींना आधी अटक करण्याची मागणी केली असून, खंडणीतील सर्व आरोपींची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सरकारमधील एखादा मंत्री सहभागी आहे का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यामध्ये खूप मोठे रॅकेट असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व आरोपींना पुण्यातूनच पकडण्यात आले आहे. याचा अर्थ सरकारमधील कोणता तरी मंत्र्याचे आरोपींना प्रचंड पाठबळ असल्याचा दावा त्यांनी केला. आरोपींना आतापर्यंत कोणी सांभाळले? त्यांना देखील अटक करायला सरकारने सुरुवात करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सांभाळण्यात ज्यांना मोठेपण वाटतो, त्यांना संभाळावे वाटते, त्यांना भाकरी खाऊ घालाव्या वाटतात, कोणाच्या तरी लेकीचा, लेकीच्या बापाचा खून केला, अशा आरोपींना जे सांभाळत आहेत. त्यांना देखील सरकारने तात्काळ अटक करायला हवी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. खंडणी मधील आरोपींची नार्को टेस्ट केली त्यानंतर शंभर टक्के सरकारमधील कोण कोण मंत्री आणि आमदार आहेत, ते समोर येईल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. हा शंभर टक्के सरकारमधील मंत्र्याचा डाव आहे. याला सरकारमधील मंत्री खतपाणी घालत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. कट कारस्थान असल्यासारखे हे सर्व दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांना हुलकावणे देण्याचा हा कट असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. सरकारमधील मंत्री यांना कशा पद्धतीने लपवून बस, कसे पळ, हे सर्व असे सांगत असेल. यांनी आधी बीड जिल्ह्याचे नाव तर बदनाम केलेच आहे. मात्र, आता पुणे जिल्ह्याचे नाव देखील बदनाम करायचे आहे का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकारमधील मंत्रीच आरोपींना शिकवत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.

आरोपीचा आकडा 50 ते 60 लोकांपर्यंत जाऊ शकतो
या प्रकरणातील आरोपीचा आकडा 50 ते 60 लोकांपर्यंत जाऊ शकतो. ही हत्याही खंडणीमुळे झाली आहे. त्यामुळे खंडणी मागणारा आधी जबाबदार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड देखील पोलिस प्रशासनाकडे आले असतील. त्यातून सर्व काही उघड होईल, असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात सरकारमधील एखादा मंत्री आहे का? हे समोर येणे गरजेचे असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

मुंडेंनी राजीनामा द्यावा : खासदार जाधव
गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. यासाठीच परभणीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. बिहारलाही लाजवेल अशी परळी असल्याचा आरोप संजय जाधव यांनी केला आहे. तेथे लाईट बिल भरले जात नाही, वाळू उपसा केला जातो त्याचा शुल्क भरले जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. पैशाच्या लालसेपोटी माणुसकी हरवून बसलेल्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आपले कर्तव्य असल्याचे संजय जाधव यांनी म्हटले आहे.

COMMENTS