Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

PUNE : आता दुचाकीसोबत दोन दोन हेल्मेट अनिवार्य

पुणे : अनेकदा दुचाकी घेतांना ग्राहकांकडून हेल्मेट घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून दुचाकी घेतांना हेल्मेट घेणे परि

शहरातील 4200 घरांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या
शहीद दिनाच्या निमित्ताने सद्भावना पदयात्रेचे आयोजन
अनिल बोंडे दिवसाही दारू पितात

पुणे : अनेकदा दुचाकी घेतांना ग्राहकांकडून हेल्मेट घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून दुचाकी घेतांना हेल्मेट घेणे परिवहन कार्यालयाने अनिवार्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाची घेतांना दोन हेल्मेट घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुचाकी विकणार्‍या शोरूमला दुचाकी खरेदी केल्यानंतर हेल्मेट देण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवी दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य असणार आहे.
सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शोरूममधून दुचाकीची विक्री करणार्‍यांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक असणार आहे. मात्र, यामुळे दुचाकींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढणारे अपघात, गाड्यांची संख्या, वाहतूक कोंडी यामुळे नियम अधिक कडक करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता पुण्यातील दुचाकीस्वारांसह मागे बसणार्‍यांनी हेल्मेट नियमित घालावे यासाठी पुणे परिवहन विभागाने मोठे आदेश दिले आहेत. यासंबधीचे एक पत्रक देखील त्यांनी काढले आहे. भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणार्‍या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणा-या मृत्युंच्या संख्येमध्ये निश्‍चित घट होवू शकते. त्यामुळे वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणा-या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 138 नुसार नविन दुचाकी वाहन खरेदी करणार्‍या ग्राहकांना, खरेदीवेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविणे आवश्यक आहे. याबाबत दुचाकी वितरकांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.

COMMENTS