Homeताज्या बातम्यादेश

दहा वर्षात 4 कोटी गरीब कुटुंबांना घरे दिली : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : मी देखील शीशमहल बांधू शकलो असतो, मात्र मी स्वतःचे घर कधीच बांधले नाही, दहा वर्षात 4 कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली आहेत,

वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे कोयना विभाग त्रस्त; आजपासून सर्वपक्षीय धरणे आंदोलन
अहमदनगर ते न्यू आष्टी डेम्यू रेल्वे बंद..!
संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्यांना एक लाखाचे बक्षीस- राजेसाहेब देशमुख

नवी दिल्ली : मी देखील शीशमहल बांधू शकलो असतो, मात्र मी स्वतःचे घर कधीच बांधले नाही, दहा वर्षात 4 कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली आहेत, आज ज्यांना नवीन घरे मिळाली आहेत, त्यांच्या स्वाभिमानाने हे घर आहे. हे नवीन आशा आणि नवीन स्वप्नांचे घर असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. दिल्लीत 4500 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी दिल्लीतील अशोक विहारमध्ये बांधलेल्या 1,675 फ्लॅटचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. याशिवाय दिल्ली विद्यापीठात 600 कोटी रुपयांच्या 3 नवीन प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. यामध्ये नजफगढच्या रोशनपुरा येथील वीर सावरकर महाविद्यालयाच्या इमारतीचाही समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अनेक नवीन शक्यता घेऊन येत आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने आपली आशा या वर्षात प्रबळ होणार आहे. आज भारत हे राजकीय आणि आर्थिक स्थिरतेचे प्रतीक बनले आहे. हे वर्ष भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत करण्याचे वर्ष असेल. आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले ते गरीबांसाठी घरे, शाळा-कॉलेज प्रकल्प आहेत. मी त्या सहकार्‍यांचे, त्या माता-भगिनींचे अभिनंदन करतो, ज्यांचे नवीन आयुष्य आता एक प्रकारे सुरू होत आहे. झोपडपट्टीत भाड्याच्या ऐवजी कायमस्वरूपी घर मिळणे. घर एक नवीन सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

प्रत्येकाला चांगले पक्के घर देण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या भारतात, देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के छत आणि चांगले घर असावे, या संकल्पने आम्ही काम करत आहोत. हा संकल्प पूर्ण करण्यात दिल्लीचा मोठा वाटा आहे. भाजपच्या केंद्र सरकारने झोपडपट्ट्यांची जागा पक्क्याने घेतली आहे.ज्यांना कोणतीही आशा नव्हती त्यांना आज पहिल्यांदाच दीड हजार घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.

COMMENTS