Homeताज्या बातम्यादेश

दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेत 179 प्रवाशांचा मृत्यू

सियोल : दक्षिण कोरियामध्ये रविवारी विमान दुर्घटना घडली. दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेवून जाणारे विमान कोसळले असून, या दुर्घटनेत 179 प्रवाशांचा

14 वर्षाच्या मुलाकडून गोळीबार
भाजप नेते विनोद तावडे यांना मातृशोक
विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकाला अटक

सियोल : दक्षिण कोरियामध्ये रविवारी विमान दुर्घटना घडली. दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेवून जाणारे विमान कोसळले असून, या दुर्घटनेत 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून जाताना हा मोठा अपघात झाला आहे.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून उतरले. हे विमान जेजू एअरवेजचे होते. विमानात 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट होते. हे विमान थायलंडहून परतत होते आणि लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. विमानतळाच्या कंपाऊंडला धडकल्यानंतर विमानाला आग लागली. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मुआन विमानतळावर बचावकार्य सुरू आहे. जेजू एअरचे फ्लाइट क्रमांक 2216 बँकॉकहून दक्षिण कोरियाला परतत होते. विमानाला आग लागल्यानंतर आकाशात धुराचे मोठे लोट पसरले. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अपघाताची माहिती मिळताच मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाने विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढले आहे. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमानतळावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS