Homeताज्या बातम्यासंपादकीय

शाब्बास, प्राजक्ता !

महाराष्ट्रात राजकारणातून कलाक्षेत्रातील महिलांची बदनामी करण्याचा भाग अलीकडे मोठ्या प्रमाणात घडू लागला आहे. मात्र, यामध्ये राजकारण आणि कलाक्षेत्र

निफाड येथे महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांचे अध्यात्मिक प्रवचनाद्वारे विज ग्राहकांमध्ये जनजागृती
जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्‍वास ठेवायचा की नाही?
विषवृल्लीला पोसणारे कोण ?

महाराष्ट्रात राजकारणातून कलाक्षेत्रातील महिलांची बदनामी करण्याचा भाग अलीकडे मोठ्या प्रमाणात घडू लागला आहे. मात्र, यामध्ये राजकारण आणि कलाक्षेत्र असा हा वाद नसून, सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने महिला कलाकारांची नावे घेतली, ते पाहता त्यांनी याच्यात जातीय संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला आहे, हे स्पष्ट दिसते. बहुजन समाजातील महिला कलाकार या मोठ्या कष्टाने छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर झळकतात. त्यांचं करिअर चांगलं सुरू झालं की, सुरेश धस यांच्यासारख्या प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यासाठी मात्र टपलेल्या असतात. प्राजक्ता माळी या कलाकार म्हणून सध्या महाराष्ट्राच्या जनतेचे मनोरंजन करीत असताना, त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये बोलवलं जाऊ शकतं. अलिकडे राजकारण्यांना एक विश्वास राहिलेला नाही की, त्यांच्या केवळ नावावर एखाद्या ठिकाणी गर्दी होईल! त्यामुळे, कलाकारांना बोलवून त्या ठिकाणी कलाकारांच्या नावे गर्दी गोळा केली जाते. कार्यक्रम राजकीय होतो. यातून राजकारण्यांना प्रेक्षक मिळण्याची गरज भागते; तर, कलाकारांना त्यांचं मानधन मिळून त्यांची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्यास मदत होते. या दोन परस्परावलंबी बाबी जर पाहिल्या तर, या दोन्ही गोष्टींचा उपयोग आपण सांस्कृतिकदृष्ट्या सकारात्मक आणि निर्मळ मनाने घ्यायला हवा. परंतु, काही प्रवृत्ती बहुजन समाजातील महिलांना किंबहुना प्राजक्ता माळी सारखी कलाकार ही एखाद्या मागासलेल्या समाजातून येऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करते; तर, लगोलग तिची सार्वजनिक बदनामी करण्याचा भाग जेव्हा एखादा राजकारणी अवलंबतो, तेव्हा ती गोष्ट निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना, ज्या पद्धतीने एक बाब समोर आणली की, ज्या ठिकाणी आम्ही इव्हेंटसाठी गेलो, त्या ठिकाणी आमच्याबरोबर पुरुष कलाकारही होते; परंतु, धस यांनी केवळ महिला कलाकारांची नाव घेऊन महिलांची बदनामी करण्याचा प्रकार केला. अर्थात, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या उपस्थित प्रतिनिधींनाही एक निश्चितपणे डोस प्राजक्ता माळी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत पाजला! कलाकारांची बदनामी सहजपणे करण्याचं धोरण प्रसारमाध्यमांनी ही अवलंबून नये. कोणत्याही पुराव्याशिवाय संघर्षातून उभ्या राहिलेल्या कलाकाराची काही क्षणात बदनामी करण्याचा षड्यंत्रात्मक भाग जर, प्रसारमाध्यमे बनत असतील तर, ते निश्चितपणे कायदेशीर कठोर कारवाई करण्यास पात्र व्हावे, अशा पद्धतीने त्यांनी मांडलेली भूमिका ही निश्चित स्वागतार्ह आहे. कोणतीही स्त्री कलाकार ही अनेक पदरी संघर्षातून उभी असते. पहिला तर, तिचा संघर्ष हा स्त्री म्हणून पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधात असतो! दुसरा, तिचा संघर्ष हा मागासलेल्या जातीतून ती जर असेल तर तो जातीव्यवस्थेचा ही संघर्ष असतो. मागासलेल्या जातींची आर्थिक स्थितीही ही येथातथाच असते, त्यामुळे तिचा तो आर्थिक संघर्ष ही असतो. त्याचवेळी ती एका कुटुंबातून येते, त्यावेळी कुटुंबातूनही तिला विरोध होत असतो; अशा क्षेत्रांमध्ये प्रवेश करताना त्यामुळे तिला तोही संघर्ष करावा लागतो. ज्या कलाक्षेत्रात ती येते तिथे तर, पुरूषी मक्तेदारी असते. अशा सगळ्या संघर्षाला पचवून जेव्हा एखादी मागासवर्गीय महिला आपलं स्थान मिळवते आणि काही क्षणात एखादी व्यक्ती आपल्या राजकारणासाठी तिला बदनाम करते, तर ती बाब निषेधार्हच आहे. प्रसारमाध्यमांनी ही केवळ आंबट शौकीन असल्यासारख्या या बाबी लिहू नये, तर, त्यांनी शहानिशा करून त्या संदर्भात निश्चितपणे काही पुरावे आहेत का ते पडताळूनच त्यांनी अशा लिखाणाला किंवा अशा बातम्यांना प्रसिध्दी द्यावी, असे सांगत, तुम्ही एखाद्या व्यक्तीची ती समाजववस्थेत कमकुवत आहे या दृष्टीनेच तिला बदनाम करण्याचा जो प्रयत्न करतात, तो प्रयत्नच निंदणीय आहे, असही प्राजक्ता माळी या त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. त्या ज्या पद्धतीने सामोरे आल्या आणि त्यामध्ये त्यांनी जो वैचारिक असे परिषदेमध्ये मुद्दे ठेवले त्याचे निश्चितपणे स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये काही सामाजिक प्रश्न संघर्षात असले, तरी तो समन्वयातून चर्चेने सोडवला पाहिजे. कोणीही सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय दृष्टीने हिंसाचार घडवत असेल, तर, त्याचा निषेध केला जाऊन त्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळायला हवी, या विचारांचे आम्ही आहोत. परंतु, एखाद्या गुन्ह्याच्या तपासाच्या आडून मागासवर्गीय समाजातील एखाद्या कलाकाराला बदनाम करण्याचा जो षड्यंत्रात्मक भाग आहे, त्याचा मात्र आम्ही जाहीर निषेध करतो.

COMMENTS