Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री आतिशी यांना अटक करण्याचा डाव : केजरीवाल यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली :राजधानीत दिल्ली सरकारने संजीवनी आणि महिला सन्मान योजनेबाबत वृत्तपत्रात नोटीस जारी केली आहे. अशा योजनांनी लोकांची दिशाभूल करू नये, असे

रामाच्या अयोध्येत भाजपचा दारुण पराभव
राज्यात तब्बल दीड लाख कोटींची तूट : अजित पवार
राज्य मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ?

नवी दिल्ली :राजधानीत दिल्ली सरकारने संजीवनी आणि महिला सन्मान योजनेबाबत वृत्तपत्रात नोटीस जारी केली आहे. अशा योजनांनी लोकांची दिशाभूल करू नये, असे सांगण्यात आले. राज्य सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नसल्याचे स्पष्टीकरण या जाहिरातीत दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून म्हटले आहे की, महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यामुळे मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याचा डाव असल्याचा भाजपवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेत केजरीवाल पुढे म्हणाले की, महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेमुळे काही लोक गोंधळले आहेत. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना एका बनावट प्रकरणात येत्या काही दिवसांत अटक करण्याचा कट रचाला आहे. त्याआधी आपच्या वरिष्ठ नेत्यांवर छापे टाकले जातील. दिल्ली सरकारने महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेसारख्या कल्याणकारी उपक्रमांच्या घोषणेने ’काही लोक’ नाराज झाले आहेत, असा दावा करत केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना जाहीर केली आहे. 23 डिसेंबर रोजी महिला सन्मान राशी आणि संजीवनी योजना सुरू केली होती. घरोघरी जाऊन महिलांना नोंदणी अर्ज देऊन त्यांचे कार्ड बनवण्यात आले. आता आपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन दोन्ही योजनांसाठी नोंदणी करून घेत आहेत. दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत, आप सरकार 18 वर्षे वयाच्या प्रत्येक महिलेला 2100 रुपये देणार आहे. याशिवाय 60 आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांनाही खासगी रुग्णालयात मोफत उपचार घेता येणार आहेत.

राजधानीत सरकार आणि प्रशासनात विसंवाद
दिल्ली सरकारने संजीवनी आणि महिला सन्मान योजनेबाबत वृत्तपत्रात नोटीस जारी केली आहे. अशा योजनांनी लोकांची दिशाभूल करू नये, असे सांगण्यात आले. राज्य सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. दिल्ली सरकारच्या वतीने दोन विभागांनी ही नोटीस बजावली आहे. महिला व बालविकास विभागाने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दुसरी अधिसूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे. त्यामुळे सरकारकडून करण्यात येणार्‍या घोषणा आणि प्रशासनामध्ये विसंवाद दिसून येत आहे.

भाजप खासदारने महिलांना पैसे वाटप केले : मुख्यमंत्री आतिशी
दिल्ली निवडणुकीत संजीवनी आणि महिला सन्मान योजनेच्या वादानंतर आता पैसे वाटपाचे प्रकरण अधिक गडद होत चालले आहे. भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्या घरी महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप ’आप’ने केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रवेश वर्मा यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 20 विंडसर प्लेस येथे महिलांना 1100 चे वाटप केले जात आहे. आतिशी म्हणाल्या की, प्रवेश वर्माला अटक करावी. ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या निवासस्थानावर छापे टाकावेत. याप्रकरणी निवडणूक आयोगानेही उत्तर द्यावे.

COMMENTS