काळ्या बुरशीवरचे इंजेक्शन गडकरींमुळे बाराशे रुपयांना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळ्या बुरशीवरचे इंजेक्शन गडकरींमुळे बाराशे रुपयांना

महाराष्ट्राच्या वर्धा येथील जेनेटीक लाइफ सायन्स येथे एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

माजी उपसरपंचाचा कुर्‍हाडीने घाव घालून हत्या
माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन
९ लाखांचा गांजा जप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली कारवाई

नागपूर/प्रतिनिधीः महाराष्ट्राच्या वर्धा येथील जेनेटीक लाइफ सायन्स येथे एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शन तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार याची किंमत प्रत्येकी बाराशे रुपये असणार आहे. 

विशेष म्हणजे आज नितीन गडकरी यांचा वाढदिवस होता. अशातच गडकरी यांनी हे रिटर्न गिफ्ट दिले आहे. गडकरींनी ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन बाजारात आणले आहे. आतापर्यंत सात हजार किंमत असणारे हे इंजेक्शन आता 1200 रुपयात मिळणार आहे. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत एकाच कंपनीतर्फे करण्यात येत होते. आता वर्ध्याच्या जेनेटीक लाइफ सायन्सलादेखील याची निर्मिती करता येणार आहे. सोमवारपासून हे विक्री साठी बाजारात उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गडकरी यांना वाढदिवशी आणखी एक भेट मिळाली. त्यांना नात झाली.

COMMENTS