Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गट महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार ?

मुंबई : महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच

बदलती जीवनशैली आणि तणाव !
वाठारला महिलांच्या ग्रामसभेत दारू दुकान-बिअर बारला विरोध
भर सभेत ग्रामसेवकाला बेदम मारहाण

मुंबई : महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पुढील पावले सावध टाकण्यास सुरूवात केली आहे. राजधानीत आपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे देखील मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी ठाकरे गटाकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असून, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे. आगामी 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबरला विधानसभा निहाय बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पदाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता. आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी असे पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे, यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकार्‍यांशी बातचीत करणार आहेत.

COMMENTS