नागपूर : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि पोलिसांवर गं
नागपूर : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. त्याचा समाचार मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घेतला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गांधी कुटुंबियांनी नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानातील आरक्षणाला विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुराव्यांसहित कभारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना आणि संविधानातील आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे. हे जगासमोर आणले. त्यामुळे काँग्रेस पार्टी आता अशाप्रकारे नाटक करायचे काम करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिले नाही. त्यांना जाणीवपूर्वक पाडले. एवढेच नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या ठिकाणी परिनिर्वाण झाले, त्या इंदुमीलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी अनेक वर्षे आंदोलने करावी लागली. पण सुईच्या टोकाइतकी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 3 दिवसांमध्ये 2 हजार कोटी रुपयांची जमीन राज्य सरकारला दिली, असाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे, असे ते म्हणालेत. लंडनमध्ये बाबासाहेबांनी जिथे वास्तव्य केले, ते घर लिलावात निघाले होते. हे घर लिलावात जाऊ देऊ नका, अशी मागणी अनेक संघटनांनी काँग्रेसच्या सरकारकडे केली होती. परंतु, त्यांनी लक्ष दिले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतले, असे फडणवीस म्हणाले.
COMMENTS