Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांनी बीड आणि परभणीत पीडित कुटुंबीयांची घेतली भेट

परभणी/बीड : खासदार शरद पवार यांनी शनिवारी बीड येथील मस्साजोग येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्य

नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन
एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा कधी?; ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल ; आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
जिल्हा रुग्णालयात रेकॉर्ड ब्रेक ओपीडीत 1353 रुग्ण नोंद

परभणी/बीड : खासदार शरद पवार यांनी शनिवारी बीड येथील मस्साजोग येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीयांनी माझ्या मुलाला ज्यांनी मारले त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.
खा. शरद पवार म्हणाले की, शांततेत आंदोलन करणार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार झाला तो अतिशय धक्कादायक आहे. सोमनाथ यांना मारहाण करणे योग्य नव्हते. त्यांना ज्यांनी मारले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सोमनाथ यांच्या मृत्यू प्रकरणी वस्तूस्थिती समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आमची आहे. शरद पवार म्हणाले की, जे सगळे घडले ते सर्वांना धक्का देणारे आहे. महाराष्ट्र विधानसभेत अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला. तुमची जी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी ही तुमची मागणी मी राज्य सरकारकडे पोहचवणार आहोत. अन्याय अत्याचार सहन करायचा नाही ही तुमची भूमिका अगदी योग्य आहे. सोमनाथ सूर्यवंशी याला काहीच आजार नव्हता. त्यांचा खून करण्यात आला आहे. तो आंदोलनात नसताना त्याला अटक करण्यात आली. सोमनाथचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला खूप त्रास दिला. 5 दिवसांमध्ये मारहाण करत ज्यांनी माझ्या मुलाचा खून केला त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. या 5 दिवसात आम्हाला काहीच माहिती दिली नाही. डायरेक्ट त्याचे निधन झाल्याचा फोन आल्याचे सांगितले.

खा. पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या मुलीची शिक्षणाची जबाबदारी
खासदार शरद पवार यांनी शनिवारी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावी भेट देऊन हत्याकांडातील पीडित संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेतेमंडळीही देशमुख कुटुंबीयांच्या निवासस्थानी पोहोचली होती. शरद पवारांसमोर आपली कैफीयत मांडताना मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळले. तर, संतोष देशमुख यांच्या लेकीनेही पवारांसमोर डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. एकंदरीत येथील वातावरण अधिकच भावूक झाले होते. म्हणूनच, गावकर्‍यांनी शरद पवारांसमोर आक्रोश करताच खासदार बजरंग सोनवणेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. दरम्यान, शरद पवार यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची जबाबदीर स्वीकारली आहे.

COMMENTS