Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना रद्द

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणार्‍या नीलकमल बोटीच्या अपघातप्रकरणी केलेल्या चौकशीतून बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास

योगासनाचा समावेश क्रीडा प्रकारात करावा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन
केडीएमसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृणाली महातेकर निलंबित

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणार्‍या नीलकमल बोटीच्या अपघातप्रकरणी केलेल्या चौकशीतून बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई सागरी मंडळाने कारवाईचा बडगा उगारत ‘नीलकमल’ बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. यासोबतच मुंबई सागरी मंडळाने बोटीतील डेकची जबाबदारी असणार्‍या बोट मास्टर आणि इंजिनची जबाबदारी असणार्‍या इंजिन ड्रायव्हरची चौकशी सध्या सुरू आहे. यांच्यावरही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका असून चौकशीअंती या दोघांविरोधातही कडक कारवाई करून त्यांचा परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याचे संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.
या अपघातात आतापर्यंत महेंद्रसिंग शेखावत (नौदल), प्रवीण शर्मा, मंगेल (नौदल बोट कर्मचारी), मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज), राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज), साफियाना पठाण, माही पावरा (3 वर्ष), अक्षता राकेश अहिरे, मिथु राकेश अहिरे (8 वर्ष) दीपक व्ही, हंसाराम भाटी, जोहान अशरफ पठाण यांचा मृत झाला असून, दोन महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रवाशांना घेऊन जाणार्‍या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS