Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युगेंद्र पवारांची मतदान यंत्राची तपासणी प्रक्रियेतून माघार

पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांनी तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली. बारामती मतदार

विदर्भ-मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता
महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात
फक्राबाद येथे दरोडा; दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांनी तर महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी विक्रमी मतांनी बाजी मारली. त्यानंतर युगेंद्र पवारांनी मतमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्रांच्या तपासणीतून माघार घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्यावतीने मतदान यंत्राविरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी अचानकपणे फेर मतमोजणीच्या प्रक्रियेतून माघार घेतल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

COMMENTS