Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संसदेचे हिवाळी अधिवेशन गदारोळातच संपले

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. प्रचंड गदारोळात झालेल्या या अधिवेशनात कामकाज होवू शकले नाही. अधिवेशनाचे सत्र 25 नोव्ह

व्यापारी संकुलाचे आज खा. शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन
Sangamner : तिसरी लाट थांबवायची असेल तर प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक (Video)
राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट ओपन
Parliament Winter Session 2024: Chaos and Controversy | Politics

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. प्रचंड गदारोळात झालेल्या या अधिवेशनात कामकाज होवू शकले नाही. अधिवेशनाचे सत्र 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले. संपूर्ण अधिवेशनात एकूण 20 बैठका झाल्या. दोन्ही सभागृहांत सुमारे 105 तास कामकाज चालले. एकूण चार विधेयके सभागृहात मांडण्यात आली. मात्र, कोणतेही विधेयक मंजूर झालेले नाही. एक देश, एक निवडणूक यासाठी सादर करण्यात आलेले 129वे संविधान (दुरुस्ती) विधेयक सर्वाधिक चर्चेत होते. मात्र ते देखील संसदेच्या संयुक्त समितीकडे अर्थात जेपीसीकडे सोपवण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित वक्तव्यावरून विरोधी आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी देखील निदर्शने सुरूच ठेवली. या गदारोळामुळे शुक्रवारी लोकसभेचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्यात आले. तर गुरूवारी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर संसदेतील खासदारांच्या वर्तनाबद्दल आणि सभागृहाची गरीमा याबद्दल चर्चा झाली.
अधिवेशनात लोकसभेची उत्पादकता 54, राज्यसभेची 41 टक्के होती. यासंदर्भात बोलतांना केंद्रीय मंत्री किरीन रिजिजू म्हणाले की, ‘मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी विचार करावा की संसदेची उत्पादकता का कमी होत आहे. संसदेचे कामकाजाचे प्रमाण 100 टक्क्यांच्या वर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते कमी करू नये. केंद्रीय मंत्री म्हणाले की, संसदेच्या या अधिवेशनात 26 दिवसांत लोकसभेच्या 20 आणि राज्यसभेच्या 19 बैठका झाल्या. या काळात लोकसभेत चार आणि राज्यसभेत तीन विधेयके मंजूर झाली. गुरुवारी संसदेच्या संकुलात खासदारांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर किरेन रिजिजू म्हणाले, ‘संसदेत घडलेली ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. काही खासदार जखमी झाले. लोकसभेच्या अध्यक्षांनी संसदेत शिस्त पाळण्यासाठी काही नोटिसाही बजावल्या आहेत. संसदेचे कामकाज चालविण्याच्या भूमिकेबद्दल मी सर्व पक्षांच्या अध्यक्षांचे आभार मानतो. संसदेचे कव्हरेज करणार्‍या पत्रकारांचेही मी त्यांच्या कामाबद्दल आभार मानतो. लोकसभेच्या कामकाज पत्रिकेनुसार शुक्रवारी 2 महत्वाची विधेयक संयुक्त समितीकडे पाठवणे प्रस्तावित होते. परंतु, लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. आंबेडकर यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. तसेच शहा यांनी माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा मागणी केली. तसेच काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी देखील स्थगन प्रस्तावाचा मुद्दा लावून धरला. त्यावरून सभागृहातील गोंधळ वाढतच गेला. अखेर सभागृहाचे कामकाज अनिश्‍चित काळासाठी तहकूब करावे लागले.

COMMENTS