Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताम्हिणी घाटातील अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू

पुणे : ताम्हिणी घाटात शुक्रवारी वर्‍हाड असलेली बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 14-15 प्रवासी जखमी झाले आहेत. बस चाक

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 72 उमेदवार रिंगणात
खर्ड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : ताम्हिणी घाटात शुक्रवारी वर्‍हाड असलेली बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 14-15 प्रवासी जखमी झाले आहेत. बस चाकणू येथून महाडला जात होती. यावेळी बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. शुक्रवारी सकाळी 9.30 ते 9.50 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. पर्पल ट्रॅव्हल्सची खासगी बस पुणे लोहगाव येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात होती. त्यावेळी ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट दरीत कोसळून उलटली. त्यात 3 महिलांसह 2 पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव, यांचा समावेश असून पाचव्या व्यक्तीचे नाव अजूनही समजू शकलेले नाही.

COMMENTS