देशात २४ तासात १,८६,३६४ नवे कोरोनाग्रस्त आढळले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात २४ तासात १,८६,३६४ नवे कोरोनाग्रस्त आढळले

देशात काल दिवसभरात एक लाख ८६ हजार ३६४ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधितांची संख्या यापेक्षा निश्चितच अधिक होते.

नारळाच्या फांदीसह विहिरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू
बारा वर्षीय मुलाने केली एका २६ वर्षीय युवकाची हत्या
नवरदेव (Bsc Agri.)’ शेतकरी राजाची गोष्ट, टिजर रिलीज

नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात एक लाख ८६ हजार ३६४ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधितांची संख्या यापेक्षा निश्चितच अधिक होते. गेल्या आठवड्यात तर ही संख्या ३ लाखांच्याही वर होती. देशात सध्या २३ लाख ४३ हजार १५२ रुग्ण उपचाराधीन आहेत.तर काल दिवसभरातल्या नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

काल देशातले दोन लाख ५९ हजार ४५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९०.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात काल दिवसभरात तीन हजार ६६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता तीन लाख १८ हजार ८९५वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० वर पोहोचली आहे. देशात सध्या २३ लाख ४३ हजार १५२ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर आत्तापर्यंतच्या एकूण करोना रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ७५ लाख ५५हजार ४५७ वर पोहोचला आहे.

COMMENTS