नवी दिल्ली :संविधानावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य
नवी दिल्ली :संविधानावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे बुधवारी देशभरात पडसाद उमटले. काँगे्रसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागण्याची मागणी करत संसद भवनासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधक खासदारांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमा असलेले फोटो होते, तसेच या खासदारांनी जयभीमच्या घोषणा देत संसद भवन दणाणून सोडला होता.
यावेळी काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँगे्रस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदार यावेळी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा घेवून आंदोलन करतांना दिसून येत होते. वाढता तीव्र लक्षात घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत डॉ. आंबेडकरांचा सर्वाधिक अवमान काँगे्रसने केल्याचे म्हटले आहे. आमचे सरकार डॉ. आंबेडकरांशी संबंधित वास्तूंचा विकास करत असल्याचे त्यांनी यावेळी सोशल मीडिया एक्सवर म्हटले आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला. दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभा येथील सभागृहात कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांकडून ‘जय भीम’च्या घोषणा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर विरोधकांनी अमित शाहांविरोधात आंदोलनही केले. आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी अमित शाह माफी मांगोच्या घोषणा दिल्या. अमित शाह यांनी आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. दरम्यान, संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर हातात डॉ. आंबेडकरांचे फोटो घेऊन जोरदार निदर्शने करत अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे अशी एकच मागणी लावून धरली. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अमित शाह माफी मांगो आणि जयभीमच्या घोषणा देत सभागृह हादरून सोडले होते.
मनुस्मृती मानणार्यांना आंबेडकरांची अडचण : राहुल गांधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर काँगे्रसने जोरदार हल्लाबोल केला असून, काँगे्रस नेते राहुल गांधी म्हणाले की, मनुस्मृती मानणार्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नक्कीच त्रास होईल. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे भाजप आणि आरएसएसच्या तिरंग्याच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला. पहिल्या दिवसापासून संघ परिवारातील लोकांना भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती. आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही, त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रचंड द्वेष आहे. ते दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांचे मसिहा आहेत आणि राहतील, असे प्रत्युत्तर खरगे यांनी दिले आहे.
COMMENTS