Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करा : डॉ.हुलगेश चलवादी

पुणे : देशाचा पवित्र ग्रंथ 'संविधान' प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत उसळलेल्या जनक्षोभानंतर अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती.मात्र,न्यायालयी

कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार
महसूल विभागाने वाळूसह जप्त केलेले वाहन लंपास
विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे गुणवंताचा सन्मान

पुणे : देशाचा पवित्र ग्रंथ ‘संविधान’ प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत उसळलेल्या जनक्षोभानंतर अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती.मात्र,न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. ही घटना धक्कादायक असून चळवळीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सुर्यवंशी कुटुंबियांच्या पाठिशी उभी राहण्याची ही वेळ आहे, अशी भावना बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१६) व्यक्त केली.
“सोमनाथ सुर्यवंशी यांनी चळवळीच्या लढ्यात प्राण अर्पण केले.त्यांच्या त्यागाला वाया जाऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत डॉ.चलवादी यांनी सरकारला आवाहन केले की, सुर्यवंशी कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे व त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.” सोमनाथ यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की , त्यामागे कुठले षडयंत्र आहे ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशी अंती दोषीविरोधात कारवाई करावी.या मृत्यूप्रकरणी सरकारने त्यांची बाजू स्पष्ट करण्याची गरज असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.“बहुजन समाज पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सुर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. आम्ही त्यांना फक्त सांत्वन देणार नाही, तर संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत राहू,” अशी ठाम भूमिका घेत, लवकरच कुटुंबीयांना भेटून पक्षाच्या वतीने मदत करणार असल्याचे आश्वासन डॉ.चलवादी यांनी दिले. सोमनाथ यांच्या आत्मत्याग हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर न्याय आणि अधिकारांसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.त्यांच्या बलिदानाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे, अशा शब्दात डॉ. चलवादी यांनी श्रद्धांजली अर्पित केली.सोमनाथ यांच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने त्यांचे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. या संकटसमयी बहुजन समाज पक्ष सुर्यवंशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. सोमनाथ यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने लोकभावना लक्षात घेता घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी बसपची भूमिका असल्याचे डॉ.चलवादींनी स्पष्ट केले.परभणीत आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अटकेतील आंदोलकांची मुक्तता करण्यात यावी तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचा देखील पुनरोच्चार डॉ.चलवादी यांनी यानिमित्ताने केले.

COMMENTS