Homeताज्या बातम्यासंपादकीय

अपघाताची संख्या कमी करण्यात अपयश !

परदेशात ज्याप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी केले आहे, त्या तुलनेत भारतातील अपघातातील प्रमाण कमी करण्यात आपल्याला अपयश आले आहे. तर याउलट भारतातील अपघा

रचना आणि पुनर्रचना
राजकीय पक्षांचे अमाप पीक ?
कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !

परदेशात ज्याप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी केले आहे, त्या तुलनेत भारतातील अपघातातील प्रमाण कमी करण्यात आपल्याला अपयश आले आहे. तर याउलट भारतातील अपघातांची संख्या सातत्याने वाढतांना दिसून येत आहे, त्यामुळे अपघातामध्ये मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, ते भारतासाठी नक्कीच वेदनादायी आहे. यासंदर्भात नुकतेच संसदेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अपघाताच्या प्रश्‍नांवरून मला परदेशात तोंड लपवण्याची वेळ येत असल्याची प्रांजळ कबूली दिली आहे. खरंतर हा विषय टीका-टिप्पणीचा नसून उपाययोजना विषय आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये प्रचंड अशी लोकसंख्या आहे. त्यामुळे येथे नियमांना पायदळी तुडवले जाते, शिवाय चिरी-मिरी देवून अनेकजण आपली सुटका करून घेतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढतांना दिसून येते. खरंतर आजही रस्त्यावर चांगल्या प्रशिक्षित चालकाला वाहन चालवणे जिकिरीचे होते, कारण रस्त्यावर धावणारे सर्वच वाहने नियमांचे पालन करतांना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशिक्षित चालक देखील नियम पाळत नाही. यासंदर्भात लोकसभेत माहिती देतांना गडकरी म्हणाले की, दुर्दैवाने आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. 4 लाख 80 हजार 583 अपघात झाले असून मृतांची संख्या 1.5 लाखावरुन सुमारे 1 लाख 78 हजार झाली आहे. त्यात 60 टक्के पीडित हे 18 ते 34 वयोगटातील आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. त्यामुळे दरवर्षी अपघातामुळे आपण दरवर्षी 1 लाख 78 हजार व्यक्तींचा जीव गमावतो. त्यामुळे अपघातामुळे होणारे मृत्यू ही आपल्या देशासाठी लाच्छंनास्पद बाब आहे. खरंतर मानवी चुकांमुळे होणारे अपघात नवीन नाही. मात्र यावर कुठेतरी मर्यादा घालायला पाहिजे, तसेच कठोर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. कारण यातून कुणाचा तरी मृत्यू होणार आहे. मात्र आपल्याकडील व्यवस्था अजूनही कठोर उपाययोजना करण्यास तयार नाही. कायदे करून अपघात कमी होणार नाही, तर त्यासाठी कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे, मात्र ती मानसिकता ना सरकारची आहे ना, प्रशासनाची. त्यामुळे अपघाताची संख्या सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे यावर कठोर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. रस्त्यावर धावणार्‍या गाडीचा चालक कोण आहे? त्याच्याकडे परवाना आहे का? त्याने मद्यप्राशन तर केले नाही? या सर्व बाबींची पूर्तता करण्याची गरज असतांना ती होत नाही. त्यामुळे सर्रास गाडी कुठेही थांबवणे, थुंकणे, रस्त्यावरच गुळणा भरणे, आदी कामे सर्रास चालकांकडून, त्यातील प्रवाशांकडून होतांना दिसून येतात. कारण आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, अशीच मानसिकता या सर्वांची झालेली आहे. त्यामुळे ही मानसिकता मोडीत काढण्याची गरज आहे. तरच आपण अपघातांची संख्या कमी करू शकू. अन्यथा अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच जाणार यात कोणतीही शंका नाही. खरंतर गडकरी यांनी प्रांजळ कबुली दिली की, जागतिक परिषदेत गेल्यानंतर अपघातांच्या संख्येबद्दल विचारल्यावर मला तोंड लपवावे लागते. खरंतर ते सरकारचे अपयश आहे. सरकारने प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिल्यास अपघातांची संख्या निम्म्यावर येईल. मात्र ते होत नाही. त्यामुळे व्यवस्था सुधारावी लागेल, त्यासोबतच नागरिकांना उत्कृष्ट रस्ते, रस्त्यांवर योग्य त्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. शिवाय अपघात झाल्यानंतर त्या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून दिल्यास त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल, त्यामुळे उपाययोजना मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतील, तरच अपघातावर नियंत्रण येतील. अन्यथा दरवर्षी अपघातांची संख्या आणि मृतांची संख्या वाढतच जाईल. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी किंबहून ते होवूच नये, यासाठी सरकारने कायद्याचा कठोर बडगा उगारण्याची आजमितीस खरी गरज आहे, मात्र सरकारची आणि प्रशासनाची ती इच्छाशक्ती दिसून येत नाही. त्यामुळे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS