Homeताज्या बातम्यादेश

प्रोबा-3 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा :भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरूवारी प्रोबा-3 मिशन लाँच केले. दुपारी 4:04 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ के

पाडव्यानिमित्त चारचाकीपेक्षा दुचाकीला पसंती
Xiaomi ने आपले Redmi Watch 3 लॉन्च केले
या राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी

श्रीहरिकोटा :भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने गुरूवारी प्रोबा-3 मिशन लाँच केले. दुपारी 4:04 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकलद्वारे या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सी चे आहे. कोरोनग्राफ आणि ऑकल्टर या दोन उपग्रहांद्वारे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. बुधवारी संध्याकाळी 4:08 वाजता इस्रो या मोहिमेचे प्रक्षेपण करणार होते, परंतु तांत्रिक समस्येमुळे त्याचे प्रक्षेपण एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी प्रोबा-3 मिशन लाँच करण्यात आले.

COMMENTS