Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मरगळवाडीचे पोपट शिंगाडे यांचा ’भारत गौरव’ पुरस्काराने सन्मान

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील वळई मरगळवाडीचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त नायब सुभेदार व सध्या माण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन; सातारा शहरावर दु:खाचा डोंगर
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील वळई मरगळवाडीचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त नायब सुभेदार व सध्या माण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोपट सीताराम शिंगाडे यांना ’भारत गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिल्ली येथील इंडिया इस्लामिक सेंटरमध्ये भारत गौरव समिती आणि कालीरमण फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. धर्मवीर चौधरी यांच्या हस्ते शिंगाडे यांना सपत्नीक हा सन्मान करण्यात आला.
कायम दुष्काळी असलेल्या मरगळवाडी गावातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोपट शिंगाडे यांचा जन्म झाला. कुटुंब ऊसतोड कामगार, वसईला मातीकाम, मेंढपाळ, तसेच रंगकाम करत जगत होते. मात्र, या बिकट परिस्थितीतही शिंगाडे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल केली. शिक्षण घेतानाच त्यांनी भारतीय लष्करात भरती होण्याचे स्वप्न साकार केले. लष्करात 18 वर्षे देशसेवा केल्यानंतर त्यांनी महसूल विभागात कार्यरत राहून समाजसेवेत सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः कोरोना काळात अनेक कुटुंबांना त्यांनी दिलेला मदतीचा हात समाजकार्याचे अप्रतिम उदाहरण ठरला.
पोपट शिंगाडे यांना मिळालेल्या या मानकर्‍याबद्दल माण-खटाव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, तसेच महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिंगाडे यांच्या कार्यामुळे माण तालुक्याचा नावलौकिक वाढला असून, त्यांचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

COMMENTS