Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशासनात उल्लेखनीय : राहुल शेळके

अहिल्यानगर : आपल्या दिव्यांगावर मात करून दिव्यांग कर्मचारी आपले काम चांगले करतात. दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य कणखर असते. त्यांचे कार्

धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार
पत्रकारांना खुलासा विचारणे चुकीचे ; जिल्हाधिकारी डॉ. भोसलेंनी घेतली मनपा आयुक्त गोरेंची झाडाझडती
कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी

अहिल्यानगर : आपल्या दिव्यांगावर मात करून दिव्यांग कर्मचारी आपले काम चांगले करतात. दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य कणखर असते. त्यांचे कार्य चांगले आहे . ज्याचे मानसिक आरोग्य चांगले असते, तो चांगले कार्य करतो. जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कार्यप्रशंसणीय आहे, असे गौरव उद्गार अहमदनगर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल शेळके यांनी काढले. ते जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा  गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
 यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी  भास्करराव पाटील, लेखाधिकारी रमेश कासार, शिक्षण विस्तार अधिकारी  राधाकिसन शिंदे, माजी सभापती रामदास भोर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते शेळके पुढे म्हणाले की, दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. वाहने, उपकरणे वाटप यावर लवकर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविकात दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री साहेबराव अनाप यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहने, उपकरणे लवकर मिळावी, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची  सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करून करून प्रमोशन प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी. दरवर्षी जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार एका दिव्यांग शिक्षकाला मिळावा, अशी मागणी केली. यावेळी संघटनेच्या वतीने 16 दिव्यांग कर्मचाऱ्यांना गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्यसह कोषाध्यक्ष  संतोष सरवदे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड, सचिव पोपट धामणे,श्रीकांत दळवी, राजीव शिंदे, राजेंद्र औटी ,पोपट धामणे, राजेंद्र ठुबे, राजेंद्र औटी, ललित वाकचौरे नंदकुमार खंडागळे ,किरण माने ,योगेश सूर्यवंशी,यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून दिव्यांग कर्मचारी संघटनेचे  साहेबराव मले, शिवाजी आव्हाड, सुनील मेचकर, भाऊराव नागरे, खंडू बाचकर,  दादासाहेब गव्हाणे,विजय अंधारे, सचिन रनाते, आबासाहेब बिडकर,  विलास सावंत, भारत तोरमल, सुनील सिनारे आदी प्रयत्नशील होते.  

COMMENTS