Homeताज्या बातम्यादेश

आयपीएस अधिकार्‍याचे अपघातात निधन

बंगळुरू : कर्नाटकात आयपीएस अधिकार्‍याचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन असे 26 वर्षीय मृत आयपीएस अधिकार्‍याचे नाव आहे. हर्षवर

उसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या
धामोरीमध्ये धर्मनाथ बीजेनिमित्त कार्यक्रम

बंगळुरू : कर्नाटकात आयपीएस अधिकार्‍याचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन असे 26 वर्षीय मृत आयपीएस अधिकार्‍याचे नाव आहे. हर्षवर्धन कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे रहिवासी होते. पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात एका भीषण अपघात 26 वर्षीय आयपीएस अधिकारी यांचा मृत्यू झाला. पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होत असताना त्यांचा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हसन तालुक्यातील कित्ताणे गावाजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात घडला. टायर फुटल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला आणि झाडाला धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली. हर्षवर्धन हसनकडे होलेनरसिपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारण्यासाठी जात होते. त्या प्रवासादरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला.

COMMENTS