Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईव्हीएमविरोधासाठी विरोधक एकवटले

मुंबई :राज्यात महाविकास आघाडीच्या सभांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, लोकसभेतील यश यानंतरही महाविकास आघाडीचा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. निकाल

नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर ; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
जमीनीच्या वादातुन शेतकर्‍यावर चौघांचा विळ्याने हल्ला ;मुलगा, सुनेला ही मारहाण
स्केटींग करायला गेली अन् दणकन आपटली; पाहा व्हायरल व्हिडिओ | LOK News 24

मुंबई :राज्यात महाविकास आघाडीच्या सभांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, लोकसभेतील यश यानंतरही महाविकास आघाडीचा दारूण पराभव पत्करावा लागला आहे. निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची बैठक घेत चिंतन केले. यावेळी उमेदवारांनी ईव्हीएमवर दोष दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या उमेदवारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयीन लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी कायदेशीर लढाईसाठी विशेष वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना व्हीव्हीपॅट तपासणीसाठी पुरावे गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, इंडिया आघाडी देखील या मुद्द्यावर एकत्र येऊन संघर्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता मागे हटायचे नाही, लढायचे, असा ठाम संदेश उमेदवारांना देत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा विरोध करण्याची तयारी दाखवली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएम संदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी वकिलाची एक फौज उभी करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे.

COMMENTS