Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागा : मनोज जरांगे

जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा भडका उडझ्याची चिन्हे आहेत. कारण मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक स

शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
Aurangabad : महिला अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन (Video)
संभाजीनगरमध्ये ई-बसच्या आगमनाबाबत ‘तारीख पे तारीख’

जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा भडका उडझ्याची चिन्हे आहेत. कारण मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाने आता आपल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या समाजाला निवडणूक डोक्यातून काढून टाकण्याचाही सल्ला दिला.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एका टप्प्यात निवडणूक झाली. आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS