Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 706 कोटी 98 लाखाची मालमत्ता जप्त

मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात के

पैशाचा पाऊस पाडतो असे सांगत केली ५६ लाखांची फसवणूक | LokNews24
आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा
शेतीसाठी वीज पुरवठा खंडित करू नका

मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण 10 हजार 139 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 10 हजार 134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे अ‍ॅप कोणत्याही पस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
विधानसभा निवडणुकीत मद्य, रोकडचा अक्षरक्षः धुमाळूक घातल्याचे दिसून आले. यंदा 706 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. मात्र 2019 मध्ये हा आकडा फक्त 103.61 कोटींपर्यंतचा होता. म्हणजेच 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत 7 पटीने अधिकचे आमिष मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो निवडणूक आयोगाने हाणून पाडला आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

COMMENTS