Homeताज्या बातम्यासंपादकीय

उद्या, सत्ता स्थापनेचे दावे..!

परवाच्या दखल'मध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटले होते की, 'राज्यात सत्ता बदल अटळ, परंतु...' त्यात, आम्ही काही अटी आणि शर्ती यांची चर्चा केली होती. ते लक

हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण
अण्णांची पुण्याई : मोहोळच्या जागेवर राजू खरे यांना संधी
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

परवाच्या दखल’मध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटले होते की, ‘राज्यात सत्ता बदल अटळ, परंतु…’ त्यात, आम्ही काही अटी आणि शर्ती यांची चर्चा केली होती. ते लक्षात घेता, काल राज्यातील राजकीय पक्षांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी लगबग झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीची तातडीची बैठक ही काल झाली. महाविकास आघाडीतील एक नेते संजय राऊत यांनी २३ तारखेलाच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्यक्ष सत्ता स्थापनेसाठी अवघे दोन दिवस आहेत; या दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीने बहुमत मिळूनही जर दावा केला नाही, तर, निश्चितपणे २६ तारखेला राष्ट्रपती राजवट लागू शकेल. या दरम्यान जर महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर, राष्ट्रपती राजवटीनंतर आमदार पळवापळवी चा भाग होऊ शकतो! हे लक्षात घेता, आता सत्ता स्थापनेला वेग आला आहे. अशातच राहुल गांधी यांनी देशाचे अग्रणी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर निवडणुकीमध्ये ते हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला आहे. एका बाजूला हा आरोप होत असताना, दुसऱ्या बाजूला अमेरिकेत अदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये त्यांनी टेंडर मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचे प्रकरण बाहेर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या अटकेचे ही मागणी केली आहे. त्यांनी अतिशय आक्रमक शब्दांत आरोप करीत म्हटले आहे की, अदानी यांनी भारताला हायजॅक केले आहे! हा अतिशय गंभीर आरोप आहे. महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या सत्तेच्या घडामोडी मध्ये देखील अदानी यांचा पैसा वापरला गेला, अशा प्रकारचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार केला होता. परंतु, एका मुलाखतीमध्ये महायुती मधील एक नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटून निघून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या नावावर केलेले अजित पवार यांनी सत्ता स्थापनेच्या घडामोडीमध्ये अनेक राजकीय नेत्यांबरोबर उद्योगपती अदानी हे देखील उपस्थित असल्याचा गौप्यस्फोट  करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अदानी यांची दखल कशी आहे यावर एक प्रकारे त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. नव्या सरकार स्थापनेच्या अनुषंगाने देखील धारावी प्रकरण हे अग्रणी असल्यामुळे, अदानी या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप राहुल गांधी हे करत आहेत. यावेळी, राहुल गांधी यांनी अदानींच्या थेट अटकेची ही मागणी केली आहे. इतकी आक्रमकता अदाणींच्या संदर्भात दाखवणारे राहुल गांधी, हे सत्ता स्थापनेच्या दिशेने अधिक आक्रमक दिसत आहेत. अर्थात, एक्झिट पोल नुसार महायुतीला सत्तेच्या जवळ दाखवण्यात आले असले तरी, तीन एक्झिट पोल ने मात्र महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ असेल, असे सांगितले आहे. अर्थात, एक्झिट पोलवर आता लोकांचा तितका विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय असतील याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. उद्या २३ नोव्हेंबरला मतमोजणीला सुरुवात होईल. महाराष्ट्राची सत्ता नेमकी कोणत्या दिशेने जाणार आहे, याचे स्पष्टीकरण साधारणतः दुपारी एक वाजेपर्यंत निश्चित लक्षात येईल. महाराष्ट्राच्या सत्ता बदलाचा भाग महाविकास आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे; तर, सत्ता टिकवणे हे महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, या दोन्ही सत्ता टिकवण्याच्या किंवा स्थापण्याच्या मध्ये केंद्रबिंदू म्हणून अदानी हे आहेत.  नेमका, महाराष्ट्र निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच अमेरिकेत  काढलेले  प्रकरण अदानी आणि त्यासह महायुतीला कठीण जाणारे आहे, असे एकंदरीत दिसते.

COMMENTS