राहाता : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने राहाता तहसील कार्यालय स्वीप कक्ष आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने सायकल
राहाता : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने राहाता तहसील कार्यालय स्वीप कक्ष आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
विरभद्र मंदीर परिसरामध्ये एकत्र येऊन या सायकल रॅलीला सुरुवात होऊन शहरातील वेश-सोनार गल्ली- गडी-आंबेडकर नगर- नवनाथनगर- ग्रामीण रुग्णालय – बस स्थानक मार्ग विरभद्र मंदीर येथे या रॅलीचा समारोप झाला. जिल्हा प्रशासनाने मिशन 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मतदानाचे हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात उस्फूर्तपणे सहभागी होत मतदानाचे आपले पवित्र कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी यावेळी केले. सायकल रॅलीत शिर्डी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील समन्वयक अधिकारी, कर्मचारी तसेच साईयोग फाऊंडेशन व गुडमॉर्निंग ग्रुपचे सदस्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मनोज भोसेकर, साई योग फाऊंडेशनचे डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, दीपक दंडवते, सुनील सदाफळ, डॉ. दत्ता कानडे,पत्रकार रामभाऊ लोंढे, बाळासाहेब सोनवणे, शिक्षक ज्ञानेश्वर देवरे यासह शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS