इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार, राज्याचे नेते आ. जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी गेल्या 4-5 दिवसापासून इस्लामपूर
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार, राज्याचे नेते आ. जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी गेल्या 4-5 दिवसापासून इस्लामपूर शहरात दररोज सकाळी प्रचार फेर्या, दुपारी बैठका आणि रात्री कोपरा सभांचा धडाका लावत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. भैय्या, आमच्याकडे यायचीही गरज नाही. आम्ही साहेबांबरोबर होतो आणि आहे. आमचे मत फक्त साहेबांनाच, अशा भावना शहरातील मतदारांनी त्यांच्याकडे व्यक्त केल्या.
साठेनगर येथून पदयात्रेची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. आंबेडकरनगर, उरण भाग, शिवाजी चौक, तानाजी चौक, शाहूनगर, यशोधननगर, क्रांतिसिंहनगर, हनुमाननगर, शुभम कॉलनी, कापुसखेड नाका, यल्लामा चौक, संभाजी चौक, जावडेकर चौक, शिवनगर, किसाननगर, गणेश मंडई, अकबर मोहल्ला, आझाद चौक आदी शहरातील सर्व भागातून प्रचार फेरी काढण्यात आली.
राजवर्धन पाटील म्हणाले, इस्लामपूर शहरात जो काय विकास झाला आहे, तो साहेबांनी केलेला आहे. अलीकडे साहेबांनी शहरातील विकास कामांना 110 कोटीचा निधी दिला आहे. या शहरानेही साहेबांना सातत्याने ताकद दिली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेबांना मोठे मताधिक्य द्यायचेच, असा चंग बांधून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
शहराध्यक्ष शहाजी पाटील, अॅड. चिमण डांगे, पै. भगवान पाटील, दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, अॅड. धैर्यशिल पाटील, विश्वनाथ डांगे, सुभाषराव सुर्यवंशी, डॉ. संग्राम पाटील, शैलेश पाटील, संदीप पाटील, अरुण कांबळे, शंकरराव पाटील, राजकुमार कांबळे, पिरअली पुणेकर, संजय पाटील, पोपट पाटील, युवराज पाटील, महादेव पाटील, परेश पाटील, बंडा वाघमोडे, राष्ट्रीय खेळाडू मनिषा बणेकर, सुवर्णा जगताप, दिग्विजय पाटील, अभिजित रासकर, अभिजित कुर्लेकर, विनायक सदावर्ते, बाळासाहेब कोळेकर, संदीप माने, चंद्रकांत ताटे, विक्रम घाटगे, अभिमन्यू क्षिरसागर, अभिजित पाटील यांच्यासह शहरातील ज्येष्ठ, युवक, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रचार फेर्यामध्ये मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
COMMENTS