Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्रीच्या रांगेतील चांदोलीच्या दर्‍या-खोर्‍यात नवा पट्टेरी वाघोबा दाखल

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा वाघाची डरकाळी घुमली आहे व्याघ्र प्रकल्पामधील ’चांदोली राष्ट्रीय उद्याना’मध्ये

प्राक्तन पांडव प्रथम, ओंकार गुरव द्वतीय, कविता व स्वाती लोनबळे तृतीयराज्यस्तरीय ओबीसी सत्यशोधक परीक्षेचा निकाल जाहीर
वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त
विजबिलाच्या वसूलीसाठी ना. रामराजे यांनी दिलेल्या सूचनेला बळीराजा संघटनेचा विरोध

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा वाघाची डरकाळी घुमली आहे व्याघ्र प्रकल्पामधील ’चांदोली राष्ट्रीय उद्याना’मध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन घडले आहे. वनकर्मचार्‍यांनी केलेल्या ’कॅमेरा ट्रॅपिंग’मध्ये वाघाचे छायाचित्र कैद झाले आहे. छायाचित्रित झालेला वाघ हा नर जातीचा असल्याचा अंदाज आहे. या वाघाच्या वावरामुळे ’सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’तील वाघांचा अधिवास आणि सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
गतवर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेला वाघ वर्षभरानंतरही व्याघ्र प्रकल्पात नांदत असताना, आता प्रकल्पामध्ये नव्या वाघाचे आगमन झाले आहे. राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे. 2018 सालानंतर गेल्यावर्षी 17 डिसेंबर रोजी प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचे नामकरण ‘एसटीआर-1’ असे करण्यात आले. गेल्या वर्षभरात अगदी मुसळधार पावसातही व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्‍यांनी या वाघाच्या हालचालींवर देखरेख ठेवली. आता वर्षभरानंतरही हा वाघ व्याघ्र प्रकल्पामध्येच अस्तित्वात असल्याचे लक्षात आले आहे. अशा परिस्थितीत 24 आक्टोंबर, 2024 रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपने राती 11 वाजून 46 मिनिटांनी एका नर वाघाचे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र व्याघ्र प्रकल्पाच्या ‘टायगर सेल’ या संशोधन विभागाने तपासले. तपासणीअंती हे छायाचित्र ‘एसटीआर-1’ या वाघाचे नसून दुसर्‍या वाघाचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्गातीला वाघांवर अभ्यास करणारे संशोधक गिरीश पंजाबी यांच्याकडे हे छायाचित्र तपासण्यासाठी पाठविण्यात आले. त्यांनी हे छायाचित्र राधानगरीमध्ये सन 2022 मध्ये छायाचित्रित झालेल्या नर वाघाचे असल्याचे सांगितले. त्यामुळे आता या नव्या वाघाचे नामकरण ‘एसटीआर-2’, असे करण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 23 एप्रिल, 2022 रोजी ‘एसटीआर-2’ या वाघाचा वावर निदर्शनास आला होता. गेल्या दोन वर्षांपासून हा वाघ राधानगरीमध्येच वास्तव्यास होता. राधानगरीत या वाघाचे शेवटचे छायाचित्र यंदाच्या उन्हाळ्यात 13 एप्रिल, 2024 रोजी टिपण्यात आले होते. त्यानंतर पावसाळयात साधारण 100 किलोमीटरचे अंतर कापून हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात दाखल झाला आहे. हा नर वाघ अंदाजे सहा ते सात वर्षांच्या असून मादीच्या शोधात तो चांदोलीत आल्याची शक्यता आहे. परंतू, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या मादी वाघाचे अस्तित्व नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मादी वाघाचे स्थालांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या दक्षिणेस असलेल्या तिलारी ते राधानगरी भ्रमणमार्गामध्ये वाघांची संख्या वाढली आहे.
तिलारी ते सह्याद्री या व्याघ्र भ्रमणमार्गामधून ‘एसटीआर-1’ आणि ‘एसटीआर-2’ हे दोन्ही नर वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे हा भ्रमणमार्ग वाघांच्या संचारासाठी अनुकूल असल्याचे अधोरेखित झाले आहे.
रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक)

COMMENTS