Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात याशनी नागराजन; शाळा प्रवेश दिन उत्साहात

सातारा / प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी, देशातल्या प्रत्येक समाज समुहासाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांची प्रेरणा ह

वारकर्‍यांच्या सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग सज्ज
श्री संभुआप्पा बुवाफनची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून : मठाधिपती मिलिंद मठकरी
घरफोडीच्या गुन्ह्यांमधील 11 लाखांचे दागिने जप्त

सातारा / प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी, देशातल्या प्रत्येक समाज समुहासाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांची प्रेरणा ही उज्ज्वल भारतासाठी अन्यनसाधारण आहे. त्यांची प्रेरणा घेऊन नवी पिढी घडत असून आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे, अशी भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या निबंधक इंदिरा आस्वार यांच्यासह अन्य मान्यवरांनी शाळेला भेटी देऊन अभिवादन केले. समता सैनिक दलाच्या वतीने शासकीय कार्यक्रमापूर्वी सकाळीच शाळेला मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, मुख्याध्यापक सन्मती देशमाने, राजेंद्र कांबळे, अरूण जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांचा शाळा प्रवेश दिनानिमित्त आकाशवाणीहून महाराष्ट्रभर प्रसारित झालेला ‘सिम्बॉल आफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा कार्यक्रम मुख्य सोहळ्याच्या सुरुवातीला उपस्थितांना ध्वनीक्षेपकाहून ऐकवण्यात आला. दरम्यान नागराजन यांचे भाषण झाल्यानंतरही त्यांच्या सूचनेवरून तीच आडिओ क्लिप ऐकवण्यात आली.
श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी सकाळपासूनच लोक हायस्कूलमध्ये येऊन अभिवादन करत होते. मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तब्बल पावणेदोन तास उशीरा आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र बसून रहावे लागले. शिवाय शेकडो आंबेडकर अनुयायी कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नाराज होऊन परत गेले.

COMMENTS