Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधकांकडून शेतकर्‍यांचे अर्थिक शोषण : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजकारण हा विरोधकांचा व्यवसाय आहे. स्वत:च्या व्यवसाय दृष्टीकोणातून शेतकर्‍यांची अर्थिक पिळवणुक होत आहे. मी 90 टक्के समाजक

कराड पालिका अनुकंप प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा संपली
आयटीआयमध्ये पाटण येथील मनिष जाधव तालुक्यात प्रथम
हिरवाईने कातकरी वस्तीवर फुलवला दीपावलीचा आनंद

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजकारण हा विरोधकांचा व्यवसाय आहे. स्वत:च्या व्यवसाय दृष्टीकोणातून शेतकर्‍यांची अर्थिक पिळवणुक होत आहे. मी 90 टक्के समाजकारण व 10 टक्केच राजकारण करतो, कारण मला हृदय आहे. विरोधकांना हृदय असत तर त्यांनी दीपावलीला त्यांच्या कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना किमान 100 रुपयेप्रमाणे दिला असता तर दिवाळी शेतकर्‍यांनी आनंदाने साजरी केली असती. शेतकरी आर्थिक सक्षम झाला तर त्यांचे राजकारणाचे दुकान बंद होईल. या भीतीपोटी ते आजपर्यंत पुरेपूर काळजी घेत आले आहेत, असा आरोप इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील बोरगाव, ताकारी येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, मधुकर हुबाले प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, बोरगाव व ताकारी ही गावे एका वेगळ्या विचारांची आहेत. ही गावे मतपेटीतून उत्तर देणारी गावे आहेत. सर्वात जास्त ऊस उत्पादन करणे ही या गावांची खासियत आहे. परंतू विद्यमान आमदारांच्या गळचेपी भूमिकेमुळे या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गावांच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. ताकारी येथील व्यापारी वर्गाचे प्रश्‍न सोडवला. ताकारी गावाने केलेले परिवर्तनचा आदर्श तालुक्यातील अन्य गावांनी घेतला. त्यांच्या कुरपळच्या पाहुण्याची सत्ता गेली. कारंदवाडीत ही सत्तांतर झाले. सतत लोकांकडून होणार्‍या मागणीनुसार विरोधकांना ताकारी येथील कॅनॉलचे साधे पिचिंगचे काम करता आले नाही. मग या 35 वर्षात त्यांनी कसला विकास केला. आपण आपल्या लाडक्या पाहुण्याला ही जास्त दिवस घरी ठेवत नाही. मग आपण त्यांना इतके वर्षे का सोसतोय. या माणसाने फक्त पाहुणे सोडून कुणाची प्रगती साधली नाही. पण तुम्ही प्रत्येक निवडणुकीत त्यांना मताधिक्य देत आलात. त्यांना तालुक्यात उद्योगधंदे उभारता आले नाहीत. शेजारचा पलूस तालुका 25 वर्षे आपल्या तालुक्याच्या पुढे गेला आहे. आमदारांकडे काम घेऊन गेल्यास त्यांना पाहुण्यांची शिफारस लागते. पाहुण्यांनी शिफारस दिली तरच काम होते. त्यामुळे परिवर्तन घडवा. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तसेच मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. मी जर विकास साधला नाहीतर पुन्हा तुमच्याकडे मते मागायला येणार नाही.

COMMENTS