Homeताज्या बातम्यासंपादकीय

अमेरिकेतील सत्तांतराचा अन्वयार्थ !

अमेरिकेसारख्या विकसित देशाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे. खरंतर आत्तापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांचा विचार

यंदा चांगल्या पावसाचे वर्तमान
नवे शिक्षण धोरण
लोकप्रतिनिधींच्या सुविधांना टार्गेट का आणि कोण करतंय?

अमेरिकेसारख्या विकसित देशाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे. खरंतर आत्तापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांचा विचार केल्यास ट्रम्प सर्वात वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष राहिलेले असतांना देखील त्यांना पुन्हा संधी देणे हा तर शुद्ध मुर्खपणाच ठरला असता, मात्र तो अमेरिकेने केल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या इतिहासात महिला राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या नाहीत. हिलरी क्लिटंननंतर कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची मोठी संधी होती, मात्र ती संधी मतदारांनी घालवल्याचे दिसून येत आहे. खरंतर या निवडणुकीत सुरूवातीला जो बायडेन पुन्हा एकदा उमेदवार होते. मात्र समोरचा उमेदवार डोनाल्ड ट्रम्प असल्यामुळे डेमॉके्रटिक पक्षाने आपला उमेदवार ऐनवेळी बदलत कमला हॅरिस यांना संधी दिली. कमला हॅरिस यांनी जोरदार किल्ला लढवला असला तरी, त्यांना जर सुरूवातीच्या काळापासूनच उमेदवारी मिळाली असती तर कदाचित त्या अमेरिकेच्या पहिल्या महिल्या राष्ट्राध्यक्ष ठरल्या असत्या. हॅरीस यांनी त्यांच्या बाजूने जोरदार प्रयत्न केले. निवडणूक सर्वेक्षणातही त्याचे प्रतिबिंब उमटले. सुरुवातीच्या टप्प्यात ट्रम्प बॅकफुटवर गेले होते. पण, त्यानंतर हळूहळू चित्र बदलत गेले. दोन्ही नेत्यांमधील लढत रंगतदार बनली. हॅरीस यांची जुलै महिन्यात अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत निवड झाली. त्यानंतर आपण कशा चांगल्या अध्यक्ष ठरु हे मतदारांना पटवून देण्याचे त्यांना मोठे आव्हान होतें. अनेक मतदारांना आपण उमेदवार आहोत, हे माहितीच नव्हते, अशी कबुली हॅरीस यांनी स्वत: दिली होती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. आणि विशेष म्हणजे हिलरी क्लिटंन आणि कमला हॅरिस या दोन्ही महिला उमेदवारांचा पराभव ट्रम्प यांनीच केल्याचे दिसून येते. खरंतर ट्रम्प यांची राजकीय कारकीर्द विविध आरोपांनी चांगलीच गाजल्याचे दिसून येते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला 2015 मध्ये सुरूवात झाले. त्यावेळेस त्यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर करत त्यांनी ’मेक अमेरिका ग्रेट अगेन असे घोषवाक्य जाहीर करत आपली राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिटंन यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प 2017 मध्ये अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचा 2017 ते 2021 अशा चार वर्षांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त असाच राहिला होता. त्यांचे निर्णय अमेरिकेतील जनतेला देखील आवडले नव्हते. मात्र ट्रम्प आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम राहिले, हीच त्यांची खरी खासियत होती. या काळता अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसाठी ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा अनिश्‍चिततेचा होता. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे जागतिक नेत्यांशी अनेकदा वाद झाले. ट्रम्प हे पर्यावरण आणि व्यापार विषयक महत्त्वाच्या करारांतून बाहेर पडले आणि चीनसोबत त्यांनी ट्रेड वॉर सुरू केले. त्यातच 2020 मध्ये कोविडची साथ आली आणि त्यात अमेरिकेतील 3.5 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या सर्व काळात अर्थव्यवस्थेला फटका बसला. त्यामुळेही त्यांच्यावर प्रखर टीका झाली की, ट्रम्प यांनी कोरोना परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली नाही. त्यानंतर 2020 च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी हा पराभव स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे ट्रम्प यांची राजकीय कारकीर्दीला अंकुश लागल्याचे दिसून येत होते. मात्र हार मानतील ते ट्रम्प कसले. त्यांनी पुन्हा एकदा 2024 मध्ये प्रचार करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सिद्ध केले. खरंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जी राज्ये 7 राज्ये ठरवतात, त्याच बटलर, पेन्सलव्हेनियामधल्या सभेदरम्यान 20 वर्षांच्या हल्लेखोरांने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे गोळीबारामुळे सर्व जगाचे लक्ष पुन्हा एकदा ट्रम्प यांच्याभोवती केंद्रित झाले. आणि तिथूनच ट्रम्प यांच्याभोवती एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली, ती हॅरिस यांना तोडता आली नाही. खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांना 279 इलेक्टोरल मते मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना 223 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील सातपैकी चार स्विंग स्टेट जिंकली आहेत. यामध्ये जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हेनिया यांचा समावेश आहे. हीच राज्ये निर्णायक ठरली. आणि याच राज्यांत कमला हॅरिस कमी पडल्याचे दिसून आले.

COMMENTS