Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : भडकंबेच्या माळावर सभासदांच्या मालकीचा कारखाना व्हावा, असे स्व. एन. डी. पाटील यांचे स्वप्न होते. त्यासाठी या परिसरातील श

डंपर-दुचाकी अपघातात युवतीचा मृत्यू
भाजप पक्षात घराणेशाहीला स्थान नाही : निशिकांत भोसले-पाटील
सातारच्या त्रिशंकू भागातील पथदिवे दोन दिवसापासून बंद

इस्लामपूर / प्रतिनिधी : भडकंबेच्या माळावर सभासदांच्या मालकीचा कारखाना व्हावा, असे स्व. एन. डी. पाटील यांचे स्वप्न होते. त्यासाठी या परिसरातील शेतकर्‍यांनी पै-पै गोळा करून सभासदत्व घेतलं. परंतू हा साखर कारखाना निर्मिती होऊ नये याचा प्रयत्न कोणी केला, हे येथील जनतेला माहित आहे. त्यामुळे तुमच्या विकासाच्या व तरुणांच्या रोजगार निर्मिती आड येणार्‍या प्रवृत्तीला या निवडणुकीत परिवर्तन करून धडा शिकवा, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, भडकंबे येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते.

निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, देशातील इंग्रजांची सत्ता घालवण्याचे काम वाळवा तालुक्यातील जनतेने केले होते. आता इस्लामपूर मतदार संघाच्या आमदारांची हुकूमशाही पध्दतीची सत्ता घालवण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. त्यांनी जनतेला जाणून-बुजून विकासापासून वंचित ठेवले. मी महायुती सरकारच्या माध्यमातून गट-तट न बघता विकास केला. गावा-गावातील पाणंद रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. तुमच्या गावातील अंतर्गत रस्ते होत नसतील तर 35 वर्षे आमदारांना निवडून देऊन काय उपयोग तुमचा झाला, याचा विचार करा आणि परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS