Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २८३३ तक्रारी

‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल
“राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको”, अजित पवार ‘ LokNews24
देशातील सर्वात उंच शिवरायांचा पुतळा औरंगाबादेत | LOKNews24

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

COMMENTS