Homeताज्या बातम्याशहरं

न्याय हक्कासाठी परिवर्तन करा : निशिकांत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाची स्वप्ने पाहिली. आता स्वप्ने दाखविणार्‍यांना नको ती स्वप्ने पडू लागली आ

राज्यातील 100 सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे 9.28 कोटी थकित; थकबाकी कृषीपंप साखर पट्ट्यातील
राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशमुख यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरास सदिच्छा भेट
पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांना साश्रूनयनांनी निरोप ; चिंचेवाडी येथे अंत्यसंस्कार; सोमवारी रक्षाविसर्जन

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाची स्वप्ने पाहिली. आता स्वप्ने दाखविणार्‍यांना नको ती स्वप्ने पडू लागली आहेत. जनतेला सार्वजनिक सुविधा मिळाल्या नाहीत, हि लढाई आपल्या न्याय हक्काची आहे. परिवर्तनासाठी कोणत्याही दबावाला व अमिषाला बळी पडू नका, असे मत इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निशिकांत भोसले-पाटील यांनी इस्लामपूर शहरातील प्रभाग निहाय संपर्क दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेली 35 वर्षे ज्यांनी सत्ता भोगली. त्यांनी केलेली विकासकामे व मी कोणतेही मंत्रीपद नसताना माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे याचा आपण विचार करावा. विद्यमान आमदारांनी इस्लामपूरातील जनतेला आजपर्यंत फक्त बारामतीचे स्वप्ने दाखवली. पण सत्यात काही उतरले नाही. येथील मूलभूत प्रश्‍न जैसे थे आहेत. मी माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली. मी तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे. तुमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला एक संधी द्या. मी तुम्हाला शब्द देतो की, येणार्‍या पाच वर्षात 24 बाय 7 पाणी योजना, स्ट्रीट लाईट, अंडर ग्राउंड ड्रेनेजसह बारामती पेक्षा ही चांगला विकास तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहशीला, यात मला कोणतीच शंका नाही.

COMMENTS