Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा जाहीर : पोलीस अधीक्षकांकडून अधिसुचना जारी

सातारा / प्रतिनिधी : दिवाळी व इतर सणाचे वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणार्‍या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकार

वारकर्‍यांच्या सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग सज्ज
बेमुदत उपोषणाच्या इशार्‍याने पाईप लाईन कामास प्रारंभ
ओबीसींच्या न्यायहक्कासाठी आ. गोरे यांना वंचित बहुजन आघाडीने मागितला राजीनामा

सातारा / प्रतिनिधी : दिवाळी व इतर सणाचे वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणार्‍या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 अंतर्गत पर्यावरण (संरक्षण) नियम व सुधारीत नियम 89 जे फटाक्याच्या आवाजाच्या मानांकनाबाबत आहेत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे तसेच शोभेचे दारुकाम निष्काळजीपणाने करणे इत्यादी संभाव्य कृत्यामुळे जनतेच्या जिवितास व मालमत्तेस हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे हानी होवू नये म्हणून तसेच रहदारीच्या नियमनासाठी व सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) व्दारा प्रधान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मनाई आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केले आहे.

COMMENTS