Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना 10 ग्रॅम चांदीच्या नाण्याची भेट

नगर : अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना प्रत्येकी 10 ग्रॅम चांदीच्या नाण्याची भेट देण्यात आली आहे. पतसं

नागरिकांनी रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
समृद्धीच्या इंटरचेजच्या नावात कोपरगावचा उल्लेख टाळण्यामागे राजकारण – सुधाकर रोहोम
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था

नगर : अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना प्रत्येकी 10 ग्रॅम चांदीच्या नाण्याची भेट देण्यात आली आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा चेअरमन सतिष मोटे पा. यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. यावेळी मागील सभेत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संस्थेच्यावतीने दिपावली निमित्त संस्थेच्या प्रत्येक सभासदास 10 ग्रॅम चांदीचे नाणे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते विलास काकडे व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील  संचालकांना चांदीचे नाणे देण्यात आले.

यावेळी ह.भ.प.जाटदेवळेकर महाराज, संस्थेचे व्हा.चेअरमन दिलीप नागरगोजे, मानद सचिव शाम भोसले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, सुनिल नागरे, संदीप लगड , उद्धव जाधोर, भगवान खेडकर, मंगेश पुंड, सविता वीर, सुनिल वाघ, किसन भिंगारदे, बबन सांगळे, रुबाब पटेल, वाळीबा मुंढे, रामदास गोरे,  नेवासा तालुकाध्यक्ष विलास काकडे, प्रविण जगधणे, दिलीप मिसाळ, प्रदीप कल्याणकर, नफीस पठाण आदी उपस्थित होते.

आशिर्वादपर मनोगत व्यक्त करताना ह.भ.प आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ग्रामसेवक पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व ग्रामपंचायत अधिकारी बांधवांना दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी तारकेश्वर गड या ठिकाणी होणाऱ्या भव्य अशा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यांना निरोप दिल्यानंतर संस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये अनेक स्तुत्य असे निर्णय घेण्यात आले. संस्थेमध्ये ठेवी वाढवण्यासाठी सर्व संचालकांनी प्रयत्न करायचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.  यापुढील काळात ज्येष्ठ नागरिक व विधवा भगिनींसाठी ठेवीवर 10.50 टक्के व्याज देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला

COMMENTS